यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ८१

यशवंतराव चव्हाणानी त्यांना प्राप्त झालेली राज्यसत्ता जास्तीतजास्तपणे लोकोद्धारार्थ वापरली व इतरानी अशीच वापरावी अशी त्यांची इच्छा व प्रयत्न असे.

डॉ. आंबेडकरांनी ‘खोती बिल’ मुख्य कौन्सिलात मांडले होते. कै. भास्करराव जाधवानी कूळ कायद्यासंबंधाने एक बिल आणले होते. पण ही दोन्ही बिले मागे घ्यावी लागली. पण यशवंतरावांच्या काँग्रेसने कूळ कायदा पास करून समाजवादाचा प्राथमिक ‘ओनामा’ केला. यामुळे पुष्कळ शेतक-यांचा फार फायदा झाला. कूळांच्या मालकीच्या जमिनी झाल्या.

यशवंतरावांचे ‘समाजकारण’ सर्वव्यापक, सर्वसंग्राहक व व्यापक होते. संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर त्याची शिवाजी महाराजांच्या ध्येय धोरणाप्रमाणे प्रत्यक्ष समाजकारणात व राजकारणात व्यापक व सर्वस्पर्शी धोरण अवलंबण्यात यशस्वी प्रयत्न केले.

यशवंतरावांच्या अनेक ‘प्रस्तावना’ चिंत्य आहेत. ‘सह्याद्रीचे वारे’ वगैरेमध्ये प्रसिद्ध झालेले लेखही अभ्यसनीय ठरतात. सोप्या पाल्हाळ न करता यशवंतराव बोलत व लिहित असत. ते उत्तम वक्ते होते. त्यांची व्याख्याने सर्व सामान्य जनतेला व निरक्षर बाया बापड्यांना समजत असत. श्रोत्यांची वाण त्यांना पडली नाही. स्वत: ते असे वरीलप्रमाणे रसिक व साहित्यप्रिय असल्यामुळे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे झाल्यावर महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ त्यानी कार्यान्वित केले. ही महनीय कामगिरी होय.

१९४८ साली गांधी व धोतर जाळपोळ झाली. त्यावेळी ब्राह्मण समाजाची घरे जळाली. त्यांना दिलेली सरकारी कर्जे यशवंतरावांनी माफ केली. अशाप्रकारचे सामाजिक एकरसपण बनविण्यात यशवंतराव यशस्वी वारंवार होत.
(अपूर्ण)