यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ७७

किसनवीर हे तर त्यांचे उजवे हात होते अशी कैक मराठेतर मंडळी त्यांच्याभोवती पुढे आली. ना. रूपवते यांना तर आंबेडकरांच्या समाजातून पुढे मंत्रिपदापर्यंत आणिले. व्यापक सामाजिक धोरण यशवंतरावांना घेता आले याचे कारण त्यांच्यापुढे शिवाजीचा आदर्श होता. सर्वसामान्य मराठ्यांना उच्चभ्रू मराठ्यांच्या पुढारीपणामुळे वाव नव्हता. गुणवत्तेच्या जोरावर पदवीधर, मोठ्या दारिद्र्याच्या अवस्थेतून सर्वसामान्य मराठा कुटुंबातून ते पुढे आले होते. त्यांच्या गावातील सर्वसामान्याविषयी व बायाबापड्या विषयी त्यांना म्हणून कळवळा होता. तळागाळातील लोकाविषयी त्यांना करिता येईल तेवढे त्यांनी केले. फी माफीचा निर्णय त्यांच्या सत्तेच्या काळातच झाला. सुसंपन्न कुटुंबातील विद्यार्थ्यांनी देखील फार फायदा घेतला. पण शिकले सवरले व सावरले एवढे खरे. पण यशवंतरावांचा व्यासंग त्यांनी गिरविला नाही. हे दुर्दैव, पुष्कळ गोरगरीब-दलित व स्पृश्य थरातील गरीब यांनीही आर्थिक मागासलेपणाच्या मुद्दावर फी माफीचा फायदा घेतला. म. फुले-शाहू यांच्या शूद्रातिशूद्र समाजाला कोरड्या द्वेषातून सोडवून त्यांना शिक्षणादि सोयी त्यांच्या दारापर्यंत नेल्या. अनुदाने व शिक्षकांचे पगार सर्व देण्याचा उपक्रम चालू झाल्यामुळे शिक्षण संस्था वाढल्या. नव्या निघाल्या. त्यांच्या योगक्षेमाची पूर्ण पूर्तता झाली. म्हणून वाढल्या- वाढत आहेत. म. फुले – शाहू यांचे शूद्रातिशूद्र समाज, रयत, जनता ही आज पुढे आली आहे. खेड्यापाड्यापर्यंत राज्यकर्ती झाली आहे. ग्रामीण नेतृत्व पुढे आले आहे. याचे श्रेय यशवंतरावांच्याकडे जाते. उत्कट – भव्य तेवडे सांगणे अटळ आहे. बाळासाहेबांनी मराठ्यांना जेवढ्या नोक-या चाक-या लाविल्या तेवढ्या यशवंतरावानी लाविल्या नाहीत. ते मराठ्याचे द्वेष्ठे होते म्हणजे भटाळले होते, अशी टीका त्यांच्यावेळी व आजही जात्याभिमानी मराठा लोक करीताना आढळतात. हे खाजगीत बोलले जाते. मराठ्यांना नोकरीत घेण्याचा सपाटा बाळासाहेबांनी जो चालविला होता. त्याला यशवंतरावानी विरोध केला नाही. उलट बाळासाहेबांना सत्तेत शिरकाव करून देण्याचे श्रेय किसनवीर व यशवंतरावाकडे जाते. बाळासाहेब व यशवंतराव यांचे जे सहकार्य झाले ते बहुजन समाजाला वरदान ठरले. नाशिकच्या हि-यांच्यापेक्षा यशवंतरावांची प्रत्यक्ष पात्रता अनुभवून म्हणा, तर्कतीर्थानी ‘यशवंतसत्ता’ कशी प्रस्थापित होईल याची सल्लामसलत केली. हा पवित्रा विलक्षण ठरला व ‘चाणक्य’ ही पदवी सार्थ केली. यशवंतराव व तर्कतीर्थ देखील टीका व विरोध पचवीत १९४८ सालच्या जाळपोळीत ब्राह्मणांची घरे जाळली गेली. त्यांना यशवंतरावानी आर्थिक मदत दिली.

यशवंतरावांचा गनिमी कावा असे. मृदू-संयमी बोलणार- चालणार हे त्यांना आवडे. तर्कतीर्थ त्यांचे मतभेद रेशमी (मऊ) शब्दात व्यक्त करीतात. असे मजजवळ यशवंतराव म्हणाले. “ज्योतिनिबंध” (१९४७) साली मी तर्कतीर्थाना लिहावयास लावून प्रसिद्ध केला. ‘हे काम तेवढे तुम्ही चांगले केले.’ असे यशवंतराव दिल्लीत ते स्वत: पुन: काँग्रेस (आय) मध्ये जाण्यापूर्वी मजजवळ म्हणाले. एकूण शेहेचाळीस मिनिटे खाजगीत नवी दिल्ली येथील चव्हाणांच्या बंगल्यात निवास स्थानी त्यांची माझी बातचीत झाली. यामुळेही मला कित्येक मुद्दे येथे मांडण्यास खुलेपण प्राप्त झाले. नाहीतर मी यशवंतरावांचा आडनाव बंधू त्यांच्याच जिल्ह्यात राहणारा असून माझा प्रांत राजकारणाचा नव्हता, म्हणून यशवंतरावांच्या फारच जवळ मी गेलो नाही. कारण पडले नाही.