• 001_Krishnakath.jpg
 • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
 • 003_Shabdhanche.jpg
 • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
 • 005_Saheb_14.jpg
 • 006_Yashodhan_76.jpg
 • 007_Yashodharshan.jpg
 • 008_Yashwant-Chintanik.jpg
 • 009_Kartrutva.jpg
 • 010_Maulik-Vichar.jpg
 • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
 • 012_Sahyadricheware.jpg
 • 013_Runanubandh.jpg
 • 014_Bhumika.jpg
 • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
 • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
 • Debacle-to-Revival-1.jpg
 • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
 • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
 • sing_3.jpg

श्राव्य भाषणांसंबंधी निवेदन

ह्या संकेतस्थळावरील कै. यशवंतराव चव्हाण यांची विविध भाषणे इ.स. 1950 ते 1980 ह्या काळात ध्वनिमुद्रित केली गेलेली आहेत. ह्या दुर्मिळ व ऐतिहासिक भाषणांपैकी काही भाषणांचे ध्वनीमुद्रण, उदाहरणार्थ चांदा (चंद्रपूर) सारख्या ग्रामीण भागातील खुल्या मैदानावर त्या काळी उपलब्ध असलेल्या अपुऱ्या व जुन्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाले असल्याचे दिसून येईल. स्वाभाविकच अशा भाषणांमध्ये काही ठिकाणी अस्पष्ट आवाज, सदोष ध्वनीमुद्रणासारखे व्यत्यय ऐकताना जाणवू शकतात. सदर भाषणांतील असे व्यत्यय वा सदोष भाग काढून ती ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न संस्थेने केला आहे. तरीही काही ठिकाणी क्वचित व अंशतः तो अनुभवास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान त्यासाठी दिलगिरी व्यक्त करीत आहे.
ऑनलाईन व डाऊनलोडींगची दुहेरी सोय

महाराष्ट्राचा असा एकही भाग नाही की जेथे यशवंतरावांचे चाहते नाहीत. आजच्या तरूण पिढीने यशवंतरावांचे नाव ऐकले असले तरी त्यांना पाहिलेले नाही, किंवा त्यांची भाषणे व आवाज ऐकलेला नाही. त्यांना त्यांच्या आवडत्या इंटरनेट माध्यमात तो प्रेरक आवाज ऐकायला मिळावा असे उद्दिष्ट ही भाषणे वेब माध्यमाद्वारे उपलब्ध करण्यामागे आहे. ही भाषणे ह्या संकेतस्थळावर ऑनलाईन (streaming audio) ऐकण्याची सोय आहे. त्यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअरची गरज नाही. आपण केवळ डाऊनलोड भाषणे ह्या रकान्याजवळील बाणावर क्लीक करून भाषण ऐकू शकाल. मल्टीमिडिया व इंटरनेट सोयींनी युक्त अशा कोणत्याही संगणकावर ती ऐकता येतील. तसेच भाषणे अन्य ठिकाणाहून डाऊनलोड करून ती MP3 Players वर अथवा वाहनांतील Audio Players वर ऐकता यावी असा विचार त्या मागे आहे. अर्थात कोणत्याही मल्टीमिडियायुक्त संगणकावरही डाऊनलोड केलेली भाषणे ऐकता येतील. त्यासाठी VLC Media Player ह्या अधिकृतपणे मोफत उपलब्ध असलेल्या मिडिया प्लेअरची शिफारस करीत आहोत.

ह्या भाषणांसंबंधीचे सर्व अधिकार संस्थेने राखून ठेवले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद.
- शरद काळे, सरचिटणीस, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.

मराठी भाषणे (MP3) हिन्दी भाषणे (MP3) इंग्रजी भाषणे (MP3)