यशवंत चिंतनिका ३२

राजकारणाच्या वक्ररेषा

राजकारणात निदान सरळ रेषेत काहीच चालत नाही. कदाचित इतर क्षेत्रांतही चालत नसावे. सरळ रेषेची ही संकल्पना फक्त भूमितीतच पाहायची. वास्तव जीवनात दिसतात त्या अनेक समांतर रेषा किंवा एकमेकांना छेदून त्रिकोण, चौकोन करणा-या रेषा. हेही खरे आहे, की आकर्षक वळसे घेत मनोरम चित्ररेखा उभ्या करणा-या रेषाही असतात, त्यांना विसरून चालणार नाही. जीवनाची ही वास्तविकता गृहीत धरून चालावे लागेल व ती हसतमुखाने स्वीकारल्याने मनुष्य निराशेच्या कक्षेबाहेर पडू शकेल.