प्रादेशिक राजकारण
राष्ट्रीय नेतृत्व आता प्रदेशांतून चांगली माणसे आणून रूजवावे लागेल. विद्यमान कर्तृत्ववान नेत्यांपैकीच कोणाला तरी पुढे करून हे भारतीय सामूहिक नेतृत्व निर्माण केले जाईल. म्हणून गांधीनेहरूंच्या काळातील राष्ट्रीय नेतृत्वाच्या कल्पना आता आपल्याला बदलाव्या लागतील.
प्रादेशिक राजकारणाचेही तसेत आहे. प्रादेशिक राजकारण अधिक लोकाभिमुख करावे लागेल. तेथे तपशिलाच्या अनेक प्रश्नांवर लोकमत प्रभावी करून सामाजिक, आर्थिक प्रश्न राज्य-पाळीवर सोडवावे लागतील. राष्ट्रीय उद्दिष्टांची समानता मान्य करूनही, शेवटी सत्तेचा पाया हा प्रादेशिक राजकारणात राहणार, हे उघड आहे. म्हणून तेथे पुरोगामी शक्ती व नेतृत्व संघटित केली पाहिजेत. राष्ट्रीय उद्दिष्टांवर एकमत असणारे राजकीय नेतृत्व (Politics of Consensus) प्रादेशिक पातळीवर यशस्वी होईलच, असे नाही.