यशवंत चिंतनिका ३१

आशा-निराशा

तशी माझी प्रवृत्ती व प्रकृती आशावादी आहे. स्वभावाने मी संकटकाळी दबून जाणारा नाही. कठीण काळ येतो, तेव्हा सहन करीत वाट पाहवी लागते आणि ते करण्यासाठी एक प्रकारचा आत्मविश्वास व त्यावर आधारलेला आशावादी दृष्टिकोन असावा लागतो. पण याचा अर्थ असा नाही, की दैनंदिन जीवनात आशा-निराशेचा पाठशिवणीचा खेळ मी अनुभवलेला नाही. मला वाटते, हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येणारा नित्य अनुभव आहे. प्रासंगिक कारणासाठी का होऊना, पण दैनंदिन जीवनात कधी आशावादी, तर कधी निराश व्हावे लागते. परंतु ते किंचित काळ टिकणारे प्रसंग असतात.