कथारुप यशवंतराव-यशवंतराव गुणगणू लागले !

यशवंतराव गुणगणू लागले  !

एकदा यशवंतराव गाडीने कोल्हापूरहून साता-याला निघाले होते. त्यांच्यासोबत एन. के. पी. साळवे होते. गाडीत लतादीदींच्या गाण्याची एक टेप लावली होती. दर्दभ-या आवाजात लतादीदी एक उर्दू गझल गात होत्या. यशवंतराव एकाग्र चित्ताने गझल ऐकत होते. मग त्यांनी गुणगुणायला सुरूवात केली. ते स्वत:शीच गात होते. साळवेंना आश्चर्य वाटले. कारण, यशवंतरावांना गाताना कोणीही पाहिलेले नव्हते, ' या गाण्याचा मुखडा मला फार आवडला. आपल्या प्रियतमेच्या सौंदर्याचे नायकाने केलेले वर्णन अप्रतिम आहे.'

यावर साळवेंनी पुन्हा विचारले, ' आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हा मुखडा तुम्हाला आवडला असता का ?'

' अर्थातच आवडला असता. हा मुखडा मला तारुण्यातही आवडला असता. परमेश्वराने व निसर्गाने माणसाला आनंदी करण्यासाठी व जीवनाला अर्थ प्राप्त होण्यासाठी ज्या वस्तू उपलब्ध केलेल्या आहेत त्याचा आस्वाद घ्यायला पाहिजे. जे हे करीत नाहीत ते दांभिक आहेत, ढोंगी आहेत.'

राजकारणात राहूनही यशवंतरावांनी आपली रसिकता जपली हेच त्यांचे वेगळेपण होते.