महाराष्ट्रातील दुष्काळ -२०१

पाणी (वापर) दर

११  पाणी - दर असा असावा की ज्यामध्ये पाणी ह्या दुर्मिळ संपत्तीचे मोल वापरणारा उमजू शकेल आणि त्यामुळे पाणी कटाक्षपूर्वक गरजे एवढेच वापरण्याची प्रवृत्ती वाढेल.  पाणी-दर असा असावा की ज्यामुळे पाणी-व्यवस्थापन आणि वितरणादीचा खर्च, तसेच स्थावर-खर्च त्यामध्ये अंतर्भूत केलेला असावा.  ह्या ध्येयाची पूर्ती विशिष्ट कालावधीत व्हावी असे प्रयत्‍न केले जावे.  ज्यांना पाण्याची गरज आहे, ते त्यांना वेळेवर मिळत राहील ह्याची खात्री वाटेल असे प्रयत्‍न केले पाहिजेत.  अल्पभूधारक शेतकरी व मध्यमदर्जाचे शेतकरी ह्यांना परवडतील अशा प्रकारचे, भूपृष्ठ व भूगर्भातील पाणी वापराचे दर तारतम्यावर आधारलेले असावेत.

शेतकरी व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

१२   पाटबंधार्‍यातून मिळणार्‍या पाण्याच्या विविध व्यवस्थापकीय अंगामध्ये विशेषतः पाणी-वाटप प्रमाणात समाविष्ट करून घेण्याचे प्रयत्‍न केले जावेत.  शेतकर्‍यांना पाणी-व्यवस्थापन आणि पाण्याच्या कौशल्ययुक्त वापराबद्दल प्रशिक्षण देण्यासाठी सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेण्यात यावे.

पाण्याचा दर्जा

१३   भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाणी हे नियमितपणाने विशिष्ट दर्जाचे असेल याची योजना कार्यान्वित करावी.  ह्या हेतूने विविध स्तरीय योजना पाण्याची गुणवत्ता क्रमशः सुधारण्यासाठी अमलात आणाव्यात.

पाणी-प्रदेश निश्चितीकरण

१४   पाण्याचे साठे जेथे उपलब्ध आहेत, ते लक्षात घेऊन, देशातील आर्थिक विकासाचे कार्यक्रम व योजना आखाव्यात ज्यामध्ये शेती, औद्योगिक केंद्रे, आणि शहरी विकास अन्तर्भूत आहेत.  ह्यासाठी पाण्याची उपलब्धता पाहून पाणी-प्रदेश निश्चित केले जावेत.  आणि पाणी-प्रदेशाची जाण ठेवून देशातील आर्थिक कार्यक्रमांचे नियमन करण्यात यावे.

पाणी-संचयन

१५ पाण्याच्या विविध प्रकारच्या उपयोगातील कौशल्य वाढवण्याचा सातत्याने प्रयत्‍न व्हावा.  पद्धत, पाणी ही दुर्मिळ नैसर्गिक संपत्ती आहे ही जाणीव व दृष्टी वाढवण्याचा संकल्प ठसवावा.  पाणी-संचयनाबाबतची अंतर्दृष्टी शिक्षण, प्रशिक्षण, नियमन, प्रोत्साहन आणि निरोध ह्यातून वाढवावी.

पूर नियंत्रण आणि व्यवस्थापन

१६   प्रत्येक नित्य पूरग्रस्त नदी खोर्‍यासाठी, सर्वगामी पूर नियंत्रण आणि व्यवस्थापनाची गुरुयोजना आखलेली असावी.  पूर-विध्वंसकता कमी करण्यासाठी, पर्जन्य छायांकित प्रदेशाच्या व्यवस्थापनाला प्रोत्साहन द्यावे.  ज्यामध्ये जमिनीवरील मातीच्या आच्छादनाला संरक्षण, पर्जन्य कोसळणार्‍या प्रदेशात करावयाचे उपाय, जंगलांचे संरक्षण व जंगल क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्‍न आणि पूरपाणी प्रतिबंधात्मक धरणे असे उपाय आखलेले असावेत.  जेथे शक्य आहे तेथे पूर-पाणी साचवून ठेवणारे मोठे जलाशय निर्माण करावेत.  ज्यामुळे पूर परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळली जाऊ शकेल.  पुराच्या अजस्त्र लोंढ्यामुळे होणारी प्राण-हानी आणि स्थावर-जंगम हानी कमी करण्यासाठी म्हणून पुराचे भाकित वेळेवर सर्व संबंधितांना वेळेवर कळविण्याची सूक्ष्म यंत्रणा अस्तित्वात आणावी.  ह्यामुळे पूर-ग्रस्त प्रदेशातील अर्थोत्पादक उद्योगांना व वस्त्यांना योग्य इशारा देणे शक्य होईल आणि अशा वस्त्यांचे अन्य वसाहतीमध्ये स्थलांतर संभव बनू शकेल; ह्या समवेत सध्या चालू असलेले पूर-नियंत्रणाचे भौतिकी प्रयत्‍न ह्यापुढेही चालू ठेवण्याची गरज राहील, उदा. नद्यांच्या किनार्‍यावरील पूर प्रवाह प्रातिकारक भिंत बांधणी; नदी प्रवाहामध्ये भिंती बांधणे व खोल डोह निर्माण करणे. परंतु भर हा पुरविषयक भाकिते संबंधितांना व पूर-ग्रस्त प्रदेशाला आधी कळविण्याची काळजी घेण्यावर असावा म्हणजे पूर-ग्रस्त निवारणासाठी जो खर्च वारंवार करावा लागतो तो कमी करणे शक्य होईल.