पाणी वापराचा अनुक्रम
८. पाण्याच्या नियोजन व वापराच्या पद्धती लक्षात घेता, खालील वापर-अनुक्रम पाळावा -
- पिण्यासाठी पाणी
- पाटबंधार्यातून शेतीसाठी पाणी
- विद्युत उत्पादनासाठी पाणी
- जलवाहातुकीसाठी पाणी
- औद्योगिक व अन्य कारणासाठी पाणी.
अर्थातच ह्या अनुक्रमात विशिष्ट भूप्रदेश आणि तेथील गरजांचे खास स्वरूप पाहून काही फेरबदल होऊ शकतात.
पिण्याचे पाणी
९. १९९१ सालापर्यंत शहरी व ग्रामीण भागातील सर्व जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. पाटबंधारे आणि बहुउद्देशीय पाणी प्रकल्प नियोजित करताना त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असलेला भाग अंतर्भूत करावा. (जर त्या संबंधित प्रदेशात पिण्याच्या पाण्याची अन्य सोय उपलब्ध नसेल तर) माणसे यांच्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करणे ही कोणत्याही उपलब्ध पाण्याच्या साठ्याचा प्रधान हेतू असला पाहिजे.
पाटबंधारे (शेतीसाठी पाणी)
१०.१ विशिष्ट एक पाटबंधारे प्रकल्प-नियोजन असो अथवा संपूर्ण खोरे प्रकल्प नियोजन असो, त्याची आखणी करताना पाटबंधार्याच्या लाभाच्या संदर्भात जमीन ओलिताची क्षमता व इतर आर्थिक दृष्ट्या सक्षम अशा पर्यायी योजनांचा विचार सर्व मार्गांनी पाणी मिळण्याच्या संदर्भात व्हावा व त्याचबरोबर सुयोग्य अशा ओलिताचे तंत्राचाही विचार व्हावा. जास्तीत जास्त शेती उत्पन्न मिळू शकेल आणि कमालतम शेतकरी कुटुंबांना ह्या पाटबंधार्यातून वाहाणार्या पाण्याचा फायदा घेता येईल अशा प्रकारची प्रगाढ ताकद ह्या प्रकल्पात निहित असावी.
१०.२ पाणी-वापर आणि शेती-लाभ धोरणात सर्वगामी एकात्मता असावी.
१०.३ पाटबंधार्यातून होणार्या पाणी-वाटपात समानता व सामाजिक विषमता आढळतात त्या दूर कराव्यात. प्रचलित तक्रारीत, पाटबंधारे सुरू होतात तेथील शेतीला मिळणारे पाणी आणि कालवा जेथे संपतो तेथील शेतीला लाभणारे पाणी ह्यात तफावत आढळते. त्याचप्रमाणे मोठी शेती व छोटी शेती ह्यांना मिळणार्या पाण्याबाबतही विषमता आहे. ह्या विषमता दूर करण्यासाठी चक्रानुगतीने पाणी द्यावे; पाणी किती प्रमाणात द्यायचे व किती द्यायचे ह्याबद्दलचे तत्त्व शोधता येईल. अर्थातच हे करताना काही कमाल पाणी मर्यादा घालाव्या लागतील.
१०.४ पाट-बंधारे प्रकल्पाची क्षमतेचा वास्तवात करून घेतला जाणारा उपयोगक हा जास्तीत जास्त असावा व क्षमता व उपयोग ह्यांच्यामधील तफावत पराकाष्ठेचे प्रयत्न करून दूर केली जावी. ह्यासाठी पाणलोट क्षेत्राच्या विकासाचा दृष्टिकोन सर्व पाट-बंधारे प्रकल्पामध्ये अंतर्भूत करावा.