साहित्यसंपदा
यशवंतराव चव्हाण यांची साहित्यसंपदा
१) ''लोकांचे समाधान हीच यशस्वी राज्यकारभाराची कसोटी'' (राज्याच्या ४१ जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका, प्रकाशन: ३ - ९ - १९५७)
२) ''आपले नवे मुंबई राज्य'' - प्रकाशक पुणे - अय्यर एस.एस. - १९५७
३) ''उद्याचा महाराष्ट्र'' - (ना. चव्हाण यांची भाषण पुस्तिका) - प्रकाशक - मुंबई चिटणीस महाराष्ट्र विभाग काँग्रेस कमिटी - १९६०
४) ''महाराष्ट्राची धोरण सूची'' - (पुस्तिका) - प्रकाशक - मुंबई प्रकाशन विभाग, महाराष्ट्र राज्य - १९६०
५) ''महाराष्ट्र - म्हैसूर सीमा प्रश्न'' (पुस्तिका) - प्रकाशक - मुंबई महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी खाते - मे १९६०
६) ''महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक'' - प्रकाशक - मुंबई प्रसिध्दी विभाग, महाराष्ट्र शासन - १९६०
७) ''विचारधारा'' - (भाषण संग्रह) - संग्राहक - संपादक - लिमये न.वा., मुंबई - सागर प्रकाशन - १९६०
८) ''विदर्भाचा विकास'' (महाराष्ट्राचे कर्तृत्व जागे केले पाहिजे) - भाषण पुस्तिका, १९६०
९) ''कोकण विकासाची दिशा'' (कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन. पुस्तिका, - प्रकाशन - महाराष्ट्र शासन - मुंबई - १९६०)
१०) ''ग.वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमाला'' - १९६१ (प्रत्यक्ष आंदोलन और संसदीय लोकतंत्र) व्याख्यान, (पुस्तिका) प्रकाशन २७ - २ - १९६१
११) ''शिवनेरीच्या नौबती'' (भाषण संग्रह) - तळवळकर गोविंद व लिमये अ.ह. प्रकाशक - पुणे, व्हीनस बुक स्टॉल - १९६१
१२) ''सह्याद्रीचे वारे'' (भाषण संग्रह) मुंबई - महाराष्ट्र शासन, प्रसिध्दी विभाग, २६ जानेवारी १९६२