राजकारणाचा प्रपंच
व्यक्तिगत प्रपंचात आणि राजकारणाच्या प्रपंचात पाळावयाची पथ्य़े तशी वेगळी असतात. राजकारणाचा प्रपंच करताना दुस-याचं अंत:करण जाणावं लागतं. अडचणीत न सापडण्याची जबाबदारी घ्यावी लागते. समय ओळखावा लागतो. प्रसंग नम्र व्हावे लागते. लोकांची पारख करावी लागते. प्रामाणिक आणि फितूर, दोन्ही गृहीत धरावी लागतात. दोष आढळला, तर तो अवगुण मानावा लागतो. वेळप्रसंगी त्याकडे काणाडोळा करावा लागतो. विरोधकांशी त्यांच्याच शस्त्राने लढावे लागते. तसे करणे कित्येकदा आवश्यकच असते.
दूरदर्शीपणाने काही कयास बांधावे लागतात आणि पुन्हा सर्वांना बरोबर घेऊन पुढे जावे लागते.