सध्या श्री.पाटील ह्यांचा मराठवाड्यात काही प्रभाव नाही. त्यांना राजकीय डावपेच खेळण्याचे जुळत नाही व त्यांची तशी वृत्तीही नाही. त्यांना पक्षांतर्गत किमान प्रबळगट निर्माण करता आला नाही असे बर्दापूरकर म्हणतात. त्याचबरोबर त्यांच्या उमद्या स्वभावाचेही उदाहरण ह्या लेखात दिलेले आहे. श्री. शिवाजीराव निलंगेकर पाटील मागे पडले ह्याची कारणे तीन आहेत. त्यांना श्रेष्ठींशी जवळीक साधता आलेली नाही, पक्षात डावपेच खेळता आलेले नाहीत, आणि ह्या ना त्या मार्गाने आपल्या पाठीशी असणारा असा मराठवाड्यात एक प्रभावगट निर्माण करता आलेला नाही. प्रलोभने फेकून हा गट कसा
हा विषय ज्यावेळी विद्यापीठात चर्चिला जात होता त्यावेळी मी मुंबई विद्यापीठाच्या कार्यकारिणीचा सभासद होतो. त्या कार्यकारिणीनेच परिक्षेत अयोग्य मार्गांचा अवलंब केल्याबद्दल त्यांच्या मुलीला परीक्षेतून अर्धचंद्र दिला होता. – डॉ. रायरीकर
निर्माण करायचा ह्याचे शास्त्र पाटलांना माहीत नसावे!
निलंगेकरांचे पुनर्वसन
शिवाजीराव निलंगेकर-पाटलांचे पुनर्वसन आता होईल का हे पहावयाचे आहे. शेतकरी व गरिबांविषयी तळमळ असलेला, ग्रामीण लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला एक व्यासंगी व तळमळीचा कार्यकर्ता म्हणून लोक शिवाजीरावांना ओळखतात. त्यांची अभ्यासू वृत्ती, खोलवर विचार करण्याची पध्दत ह्यांमुळे त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान शासनाला उपयुक्तच ठरेल असे म्हणतात.
संदर्भः
१) अण्णा बोडदे – श्री. शिवाजीराव पाटील निलंगेकर (३-६-८५ ते ९-३-८६)
२) लोकप्रभा – भ्रष्टाचाराच्या भोव-यात मुख्यमंत्री, ३० मार्च १९८६
३) लोकराज्य
४) इंडिया टुडे ३१ मार्च १९८६
५) हूज हू