आमचे मुख्यमंत्री -९५

डॉ. बाळकृष्ण रायरीकर

*  जन्मः १९२०
*  १९४५ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र हा विषय घेऊन एम.ए.
*  युसुफ इस्माईल व सिडनहॅम महाविद्यालयांमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.
*  एलफिन्स्टन महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते.
*  लाला लजपतराय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य.
*  एन.एम. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजतर्फे प्रोफेसर एमेरिटस या किताबाने सन्मानित.
*  महाराष्ट्र श्रमविज्ञान संस्थेचे प्राचार्य होते.
    कामगारांच्या वेतनविषयक प्रश्नांचे एक तज्ज्ञ मार्गदर्शक.
*  राज्य सरकारच्या किमान वेतन आयोगाचे माजी सदस्य.
*  महाराष्ट्र शासनाच्या एन.सी.सी. विभागाचे विशेष अधिकारी म्हणून कार्य केले.
*  एशियाटीक सोसायटी, मुंबई या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले.
*  एम. कॉम., एम.फील. आणि पी.एच.डी. करणा-या विद्यार्थ्यांचे गाईड म्हणून मुंबई
    विद्यापीठातर्फे निवड. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे प्रमुख होते.
*  शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये जबाबदारीची अनेक पदे सांभाळली.
*  महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता या दैनिकांमधून विद्वत्तापूर्ण लेखन.
    डॉ. श्रीनिवास वसंतराव सुरनीस
*  पुणे विद्यापीठाची एम.कॉम. पदवी व मुंबई विद्यापीठाच्या एम.फील., पी. एच.डी. पदव्या
    संपादन केल्या.
*  मुंबई येथील चेतना महाविद्यालयात प्राचार्य आणि वाणिज्य व व्यवस्थापन विषयाचे
    प्राध्यापक, वाणिज्य विभागप्रमुख तसेच प्रपाठक वाणिज्य विभाग म्हणून काम केले.
*  ३३ वर्षांचा प्रदीर्घ शैक्षणिक अनुभव.
*  मुंबई विद्यापीठ व पद्मश्री डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे पी.एच.डी. आणि एम.फिल. गाईड
    म्हणून मान्यता.
* आमचे मुख्यमंत्री या पुस्तकासाठी डॉ. रायरीकर यांचेसह एक महत्वपूर्ण योगदान.