महाराष्ट्रातील दुष्काळ - ७

'दुष्काळ आणि पाणी' हा परिसंवाद, सचिवालय जिमखाना, मुंबई येथे २६-२७ मार्च ८८ रोजी संपन्न झाला.  परिसंवादासाठी यशवंतराव चवहाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. वसंतदादा पाटील सभागृहात प्रवेश करीत आहेत.  ते श्री अण्णासाहेब शिंदे, नानाभाऊ एबंडवार, प्राचार्य पी. बी. पाटील, राजाभाऊ मिराशी, बाळासाहेब थोरात, सौ. कमलाताई विचारे ह्यां च्या स्वागताचा सुहास्य मुद्रेने स्वीकार करताना दिसत आहेत.
छायाचित्र - १ (छायाचित्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

'दुष्काळ आणि पाणी' ह्या परिसंवादाचे ना. श्री शरद पवार ह्यांनी उद्धाटन केले.  मंचावर संस्थेचे प्रमुख विश्वस्त बसलेले आहेत.  मा. शरद पवारांनी हे विशद केले की यशवंतराव चव्हाणांच्या नावे स्थापित हे प्रतिष्ठान खर्‍या अर्थाने महाराष्ट्राच्या अभ्युदयाचा पक्षातीत पद्धतीने सदैव विचार करणारे व्यासपीठ होत आहे, हे ह्या परिसंवादामुळे स्पष्ट होत आहे.

छायाचित्र - २ (छायाचित्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा)


महाराष्ट्राच्या समृद्धीचे रहस्य शेतीच्या भरपूर पिकांवर आणि पाणी सहजतेने उपलब्ध असण्यामध्ये लपलेले आहे.  परिसंवादामध्ये महाराष्ट्रातील शेती व पाणी तज्ज्ञ आस्थेने हजर होते.  ह्या छायाचित्राचे वैशिष्ट्य हे की दुष्काळ आणि पाणी ह्या विषयामध्ये रस घेणारे महाराष्ट्रातील अधिकांश कार्यकर्ते येथे हजर असलेले दिसतात.  सर्वश्री शरद पवार, वि. स. पागे, नानाभाऊ एबंडवार, अण्णासाहेब शिंदे, सुधाकरराव नाईक, कवी महानोर, डॉ. पतंगराव कदम, अण्णासाहेब हजारे, प्रा. देसरडा, डॉ. ताकवले इत्यादी सहजपणे ओळखता येतात.

छायाचित्र - ३ (छायाचित्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

परिसंवादचे प्रस्ताविक.  मा. अण्णासाहेब शिंदे ह्यांनी 'दुष्काळ आणि पाण्याचे व्यवस्थापन' ह्या विषयावर आपले महत्त्वाचे जीवन-चिंतन प्रदीर्घ निबंधाद्वारे सादर केले.  ते सभागृहात प्रवेश करताना दिसत आहेत.  श्री. के. एम. बापू पाटील, विनायकराव पाटील, शांताराम गरूड, प्राचार्य पी. बी. पाटील, नानाभाऊ एबंडवार, सुधाकर नाईक इत्यादी त्यांची वाट पाहात आहेत.

छायाचित्र - ४ (छायाचित्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा)