वक्तृत्वाच्या बाबतीतही हीच गोष्ट होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र म्हणून वाणी वापरली. परंतु ते करीत असताना त्यांनी लोकशिक्षणही केले आणि हीच प्रथा मंत्रिमंडळात असताना व नसतानाही त्यांनी कायम ठेवली होती. पंजाबचे राज्यपाल म्हणून थोडी वर्षे काम केल्यानंतर परत ते जेव्हा महाराष्ट्रात आले, तेव्हा त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात गावोगाव जाऊन निर्भीडपणे आपले विचार मांडण्याची प्रथा सुरू केली. या वेळेपर्यंत मी दिल्लीत पोचलो होतो व त्यांची व माझी एकदा दिल्लीस भेट झाली, तेव्हा त्यांना मी त्यांचे हे प्रचाराचे कार्य कसे चालले आहे; असे सहज विचारले. त्यांनी वापरलेला एक शब्द माझ्या कानांत अजूनही घुमतो आहे, ते म्हणाले, 'आता प्रचारकार्याची भूमिका राहिली नाही, तर आता माझी वाणी-यात्रा चालू आहे.'
लोकशिक्षणावर श्रद्धा असणारा काकासाहेबांसारखा माणूसच अशी 'वाणी-यात्रा' करू शकतो.
मी त्या वेळी जरी जाऊ शकलो नाही, तरी तो शब्द मी पुढे बारा वर्षांनी पुरा केला आणि काकासाहेब मध्यवर्ती मंत्रिमंडळाचे सदस्य असताना त्यांच्या घरी दोन दिवस राहून आलो. दिल्लीत त्या वेळी माझ्याप्रमाणेच लहान-मोठे पाहुणे त्यांच्या घरी होते. तिथे असलेल्या अनेक पाहुणे मंडळींत महर्षि अण्णासाहेब कर्वेही होते. लोकसंग्रहाची भाषा टिळकांच्या परंपरेतील माणसे बोलतात खूप, परंतु त्यासाठी काढाव्या लागणार्या खस्ता काकासाहेब आणि त्यांच्या पत्नी यांना प्रत्यक्ष काढताना मी पाहिले आहे. काकांचे घर तेव्हाचे 'महाराष्ट्र सदन' होते, असे म्हटले, तरी चालेल. काकासाहेबांना कार्यकर्त्यांसंबंधी खराखुरा जिव्हाळा होता, याचा मी अनुभव घेतला आहे.
काकासाहेब गाडगीळ हे पिंडाने मूलतः लोकशिक्षक होते. त्यांची वाणी आणि लेखणी या दोन्ही माध्यमांतून त्यांनी हे कार्य पहिल्यापासून अखेरीपर्यंत अखंडपणे केले. काकासाहेबांची ग्रंथसंपत्ती विपुल आहे. काही शास्त्रीय विषयांवर पहिल्या प्रथम ग्रंथलेखन करण्याचे काम काकांनी केले. ग्यानबाचे अर्थशास्त्र, समाजशास्त्र वगैरे ग्रंथ हे त्याचाच पुरावा आहेत.
वक्तृत्वाच्या बाबतीतही हीच गोष्ट होती. स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्र म्हणून वाणी वापरली. परंतु ते करीत असताना त्यांनी लोकशिक्षणही केले आणि हीच प्रथा मंत्रिमंडळात असताना व नसतानाही त्यांनी कायम ठेवली होती. पंजाबचे राज्यपाल म्हणून थोडी वर्षे काम केल्यानंतर परत ते जेव्हा महाराष्ट्रात आले, तेव्हा त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात गावोगाव जाऊन निर्भीडपणे आपले विचार मांडण्याची प्रथा सुरू केली. या वेळेपर्यंत मी दिल्लीत पोचलो होतो व त्यांची व माझी एकदा दिल्लीस भेट झाली, तेव्हा त्यांना मी त्यांचे हे प्रचाराचे कार्य कसे चालले आहे; असे सहज विचारले. त्यांनी वापरलेला एक शब्द माझ्या कानांत अजूनही घुमतो आहे, ते म्हणाले,
'आता प्रचारकार्याची भूमिका राहिली नाही, तर आता माझी वाणी-यात्रा चालू आहे.'
लोकशिक्षणावर श्रद्धा असणारा काकासाहेबांसारखा माणूसच अशी 'वाणी-यात्रा' करू शकतो.