मानसिक संघर्ष
क-हाड क्षेत्रातील पांढरपेशांच्या टिळकभक्तीचा यशवंतरावावरील प्रभाव तुलनेने जास्ती बलवान ठरला. चव्हाण त्यांच्या बंधूंशी चर्चा करू लागले. शंका विचारू लागले. जवलकरांनी टिळकांवर केलेली टीका यशवंतरावांना मुळीच आवडली नाही. ‘अशा थोर माणसावरती टीका करणारी माणसे ही इंग्रजांचे मित्र तर नाहीत ना?’ या छोट्या वयात ही जी शंका चव्हाणांना आली त्यामुळेच ज्या सत्यशोधक वातावरणात ते वाढत होते. त्यापेक्षा वेगळे वातावरण चव्हाण शोधू लागले. येथेच त्यांच्या जीवनातील पहिला Turning Point त्यांनी स्वीकारला. जात्याच ते स्वतंत्र बुद्धीचे व चिकित्सक, पुढेही झाले. याचे धागेदोरे वरील घटनेत आढळतात. सत्यशोधकीय ब्राह्मणेतर चळवळ व्यंगपुराणात्मक होती. हे प्रस्तुत लेखकासही मान्य आहेच. सत्यशोधक चळवळीच्या पुढा-यांचे लक्ष क-हाड, वाई व नासिक या क्षेत्रावर विशेष होते. जवलकरांचे भाषण ही प्रतिक्रिया होती. पण शिव्याशापामुळे जवळकरांच्या विषयी त्यांचे मन विटले. जवळकर पुढे स्वातंत्र्य सैनिक होऊन तुरूंगात गेले (जेधेही गेले). हे राष्ट्रीय परिवर्तन यशवंतरावांच्या कृष्णाकाठाने लक्षात घेतले नाही. उलट स्वराज्यवादी ‘टिळक-केसरी’ पक्ष प्रतियोगी सहकारीता व लोकशाही स्वराज्यपक्ष काढून गांधी व काँग्रेस यांच्या विरोधातच उभा राहिला. बहुजनसमाज तिरंगी झेंड्याखाली गेला व टिळकानुयायी जास्तीत- जास्त प्रमाणात गांधीविरोधी राहिले. पूर्ववयात गणपतराव चव्हाण या मधल्या बंधूंना यशवंतरावांच्या निवडणुकीस पाठिंबा देते झाले. ही उलट बाजू पुढे कृष्णाकाठात निवेदिली आहेच. सत्यशोधक चळवळीतील शाहूमहाराजांच्या काळानंतर ‘जेधे-जवळकर’ यांच्या चळवळीचा हा कालखंड एका दशकाचा होता. सर्व महाराष्ट्रात सातारा जिल्हा ह्या दशकात वरील चळवळीत आघाडीवर होता. कै. पंढरीनाथ पाटील यांचे फुलेचरित्र याच काळात उपलब्ध झाले.
विद्यार्थी वयात असलेल्या यशवंतराव यांनी म. फुले चरित्र वाचले व त्यांचे पुढील विचार बनले. “महात्मा फुल्यांचा विचार मूलगामी आहे व तो काही नवीन दिशा दाखवतो आहे असे मलाही वाटले यांनी उभे केलेले काही प्रश्न तर निरूत्तर करणारे होते. शेतकरी समजाची होणारी पिळवणूक; दलित समाजावर होणारा अन्याय आणि शिक्षणापासून वंचित ठेवलेला बहुजनसमाज व स्त्रिया यांचे प्रश्न सोडविल्याखेरीज देशाचे कार्य होणार नाही, हा त्यांच्या विचारांचा सारांश माझ्या मनामध्ये ठसला.” (पृ.३४)
स्थित्यतरातून वाटचाल
एवढ्या पोर वयात जोतिबांच्या शिकवणुकीचे मुख्य सार यशवंतरावांना यथातथ्यपणे आकलन करता आले याचा विस्मय आजही कोणास वाटेल, लेखकाने वरील वयातच सदर चरित्र अनेकदा वाचले, पण जी नवी बुद्धी यशवंतरावांना सुचली ती मला सुचवू शकली नाही. यावरून यशवंरावांचे असामान्यत्व ध्यायानत येते. सावध व हुशार बुद्धी वैभव त्यांना जन्मप्राप्तच होते व वर्धमान वाचनाने ते त्यांनी वाढीस आमरण लाविले. ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रात म. फुल्यांच्या संबंधाने जे यशवंतरावांनी लिहिले आहे. यावरून त्यांच्या मनात टिळकांच्या विषयी जो आदर होता. तितकाच म. फुल्यांच्या विषयी होता (पृ. ३५)