'व्यक्तीची यशस्विता तिच्या अवतीभोवती असलेल्या मित्रांवर अवलंबून असते' असं एके ठिकाणी यशस्वितेबद्दल साहेबांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे.
शामरावजी अष्टेकर (माजी मंत्री), आ. एम. एम. शेख, प्रा. डॉ. जी. टी. देगावकर, प्रा. डॉ. विजय देशमुख, प्रा. झारगड मामा, प्रा. वसंत पुजारी, डॉ. एम. डी. जहागीरदार, प्राचार्य सखाराम बागल, प्राचार्य आत्माराम टेंगसे, प्राचार्य डॉ. बाबुराव सोळुंके, प्राचार्य डॉ. हिंमतराव नरके, प्रा. एस. आर. बनसोडे, प्राचार्य तिलावत अली, प्रा. डॉ. बी. डी. सुडे, प्रा. डॉ. के. वाय दौड, मा. माधवराव बोरडे, मा. एस. आर. काळे, प्राचार्य सुंदरराव पवार, प्राचार्य भागवत कटारे, प्राचार्य कुरणकर डी. बी., प्रा. अशोक तेजनकर, प्रा. शुजाद काद्री, प्राचार्य रामेश्वर पवार, कै. प्रा. ओमप्रकाश शिंदे, प्रा. डॉ. संजय गायकवाड, प्रा. डॉ. नामदेव आहेर, अण्णासाहेब जगदाळे, कै. रामपालभाऊ बलदवा, भाऊसाहेब निकम यांची सगत लाभली.
कै. बाबुरावजी काळे (माजी मंत्री) हे गुणपारखी नेते होते. कै. बाबुरावजी ऊर्फ अप्पासाहेब काळे यांनी माझी मुलाखत न घेता पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात माझी अधिव्याख्याता म्हणून नेमणूक केली. मी हे पुस्तक लिहीत असताना मला संदर्भाच्या बाबतीत ज्या अडचणी आल्या त्या प्रभारी प्राचार्य शिवाजी अंभोरे आणि यू. आर. काळे यांनी प्रा. बनसोडे व प्रा. बिरुटे यांचे मार्गदर्शन घेऊन सोडविल्या.
रामसेतू बांधताना खारीनं जी भूमिका पार पाडली तशीच भूमिका यशाचं शिखर गाठताना विठ्ठल पाथ्रीकर, के. एल. पाथ्रीकर, के. एन. पाथ्रीकर, किशोर पाथ्रीकर, जयराज पाथ्रीकर, दामोदर पाथ्रीकर, डॉ. कैलास पाथ्रीकर, के. बी. पाथ्रीकर यांनी पार पाडली.
माझ्या या लिखाणाचे पहिले वाचक होण्याचा मान प्रा. डॉ. शरद व्यवहारे आणि सोमनाथ आहेर यांना मिळाला. माझं हे लिखाण वाचण्यायोग्य करण्याचं काम जगन्नाथ भोसले यांनी केलं. कुंडलिक अतकरे यांच्या यशवंतरावांप्रती असलेल्या निष्ठेचं फळ म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन.
माजी खासदार श्रीनिवास पाटील हे कराडचे खासदार. त्यांची प्रस्तावना या पुस्तकाला मिळाली. यशस्वी प्रशासक, प्रभावी खासदार म्हणून त्यांनी साहेबांच्या विचाराची पाठराखण केली आहे.
मा. विनायकराव पाटील (माजी मंत्री) यांनी या पुस्तकाविषयी आपल्या भावना लिहून आम्हास उपकृत केले. मा. विनायकराव पाटील साहित्याचे वारकरी तर आहेच, त्यासोबतच यशवंतरावांच्या आणि त्यांच्या विचारांची नाळ एक आहे.
मा. चेतन चव्हाण (साहेबांचे नातू) व मोहनराव डकरे यांचे या कामी सहकार्य लाभले.
माझ्या कुटुंबाबद्दल लिहिलेच पाहिजे असं काही नाही. कारण निवृत्त झाल्यानंतर मी हे पुस्तक लिहिलं. गेले दीड वर्ष माझ्या स्वतंत्र खोलीत हा संकल्प मी पूर्ण केला. त्यामुळे माझा त्यांना व त्यांचा मला उपद्रव झाला नाही. गेल्या तेहतीस वर्षांत माझी अवेळ हीच वेळ सौ. कल्पना पाथ्रीकर हिच्या अंगवळणी पडल्यामुळे तिच्यासह घरातील सर्वांनी मला समजावून घेतलं. मुले राजेंद्र व समीर पाथ्रीकर तसेच अनिल साखरे यांनी वेळी-अवेळी या पुस्तकाच्या संदर्भात सांगितलेली कामं आज्ञाधारकपणे पार पाडली. तिसर्या पिढीचे प्रतिनिधी चि. विराज व कु. हर्षदा पाथ्रीकर यांनी कसलाच त्रास दिला नाही. ज्या पुस्तकांचा मी आधार घेतला ती पुस्तकं या लिखाणाचा पाया आहेत.
शेवटी हे शिवधनुष्य पेलण्याची ताकद थोरले साहेब यांच्या ध्येयधोरणामुळे माझ्यात निर्माण झाली. केवळ साहेबांमुळे आणि साहेबांच्या ध्येयधोरणाकरिता माझं हे शब्दशिल्प साकारलं.
प्रा. डॉ. विजय पाथ्रीकर
दि. १५-७-२०१०