यशवंतराव चव्हाण (67)

रशियाकडून मदत घेण्याबाबत लालबहाद्दूर शास्त्री यांचा निर्णय होत नाही हे पाहिल्यावर यशवंतरावांनी ब्रिटनला भेट देण्याचे ठरविले. १९६४ च्या नोव्हेंबर महिन्यात ते ब्रिटनला गेले. भारताला संरक्षणाबाबत सहाय्य मिळविण्याचे दृष्टीने त्यांनी तेथे संबंधितांशी बोलणी केली. तथापि चर्चेतून निश्चित स्वरूपाचे कसलेही आश्वासन मिळे शकले नाही. विल्सन हे पंतप्रधानपदी होते. विल्सन आणि माऊंटबॅटन यांना जाणीव करून दिली की ब्रिटनने भारताला मदत देण्यास अनुकूलता दर्शविली नाही तर शस्त्रास्त्रांच्या खुल्या बाजारातून भारत शस्त्रे विकत घेईल. माऊंटबॅटन यांनी कोरड्या आश्वासनापलीकडे कांहीही केले नाही. जुन्या पाणबुड्या व युद्धनौका देण्याची तयारी दर्शविली. भारताला अशा प्रकारची मदत नको होती म्हणून चव्हाण ब्रिटनहून भारताला परत आले. अमेरिका व ब्रिटन यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे रशियाशी मैत्रीसंबंध वाढवून जास्तीत जास्त लष्करी मदत मिळवायची असे ठरविण्यात आले. रशियाकडून शस्त्रास्त्रांची मदत मिळविल्यामुळेच १९६५ च्या भारत-पाक युद्धात भारत वरचढ ठरला. दोन-तीन वर्षाच्या कारकिर्दीत चव्हाणांनी संरक्षणखात्याचा चेहरामोहरा बदलून टाकल्याने, लष्करी अधिकार्‍यांना उत्तेजन दिल्याने, जवानांशी संवाद वाढविल्याने संरक्षण दलामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण झाले आणि त्याचा प्रत्यय १९६५ च्या लढाईत आला. सरसेनापती जनरल चौधरी असोत वा अन्य सेनापती असोत, त्यांना संरक्षणमंत्र्यांचा दरवाजा चर्चेसाठी, विचारविनिमयासाठी यशवंतरावांनी खुला ठेवला होता. चव्हाणांनी आपल्या लष्करी अधिकार्‍यांना कधीही कमी लेखले नाही की त्यांचा पाणउतारा केला नाही. १९६२ पूर्वी असे प्रसंग घडत, म्हणूनच चव्हाणांच्याबद्दल लष्करात वरपासून खालपर्यंत आपुलकीची व आदराची भावना निर्माण होऊन यशवंतराव सांगतील ते ऐकायला सर्वजण एका पायावर तयार होत असत.

१९६५ च्या सुरुवातीला पाकिस्तानने कच्छच्या रणात भारताच्या हद्दीत आक्रमण केले. उभय सेनेत चकमकी उडाल्या. तथापि दोन्ही देशांनी त्याचे युद्धात रूपांतर होऊ नये याची दक्षता घेतली. नंतर एप्रिल महिन्यात पाकने युद्धबंदी रेषा ओलांडून भारताच्या पोलिस ठाण्यावर हल्ला केला. हा हल्ला परतवून लावल्यावर कच्छच्या भागात पाकने मोठ्या शक्तिनिशी लष्करी हल्ले चढविण्यास सुरुवात केली. भारताच्या हद्दीत खोलवर मुसंडी मारली. भारताला आपली कांही ठाणी सोडून मागे सरकावे लागले. पाकने एकप्रकारचे अघोषित युद्धच सुरू केले. दिल्लीत खळबळ उडाली. पंतप्रधानांना लोकसभेत निवेदन करावे लागले. शास्त्रीजींनी घोषित केले की पाकने आक्रमक भूमिका चालू ठेवली तर भारताला लष्करी शक्तीचा वापर करावा लागेल. पंजाबच्या शेकडो मैल लांब सरहद्दीवरील ठिकाण हल्ल्यासाठी निवडावे लागेल. पंतप्रधानांची ही घोषणा आणि संरक्षणमंत्र्यांचा आदेश मिळताच लष्करी वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्या हालचाली वेगाने सुरू केल्या. भारताने दुसरी आघाडी उघडून युद्धाचे क्षेत्र वाढवू नये यासाठी ब्रिटन-अमेरिकेने भारतावर दबाव आणण्यास सुरुवात केली. कॉमनवेल्थ परिषदेत विल्सन यांनी तडजोडीचा प्रस्ताव मांडला. जूनमध्ये युद्धसमाप्‍तीचा करार करण्यात आला आणि १ जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. कच्छ भागाबाबत या वाटाघाटी सुरू असताना पाकने काश्मिरमध्ये युद्धबंदी रेषेचा भंग करण्याचे दृष्टीने हालचाली केल्या. सीमारेषा भंगाचे प्रकार वरचेवर घडू लागले. भारतातले लोकमत प्रक्षुब्ध बनू लागले. पाकिस्तानचे घुसखोर भारताच्या हद्दीत पूंचपर्यंत शिरले. श्रीनगरपर्यंत व जमल्यास त्यापुढेही सरकण्याचा त्यांचा इरादा दिसला. गनिमांच्या नांवाखाली हजारो घूसखोरांनी काश्मिरमध्ये प्रवेश केलेला होता. त्यांचा हेतू स्पष्ट झाल्याने पंजाबची हद्द डोळ्यापुढे ठेवून लाहोरच्या दिशेने मुसंडी मारण्याचा आराखडा भारतीय लष्कराने तयार केला. जम्मू क्षेत्रात पाकच्या लष्कराने प्रवेश करून पुढे सरकायचा प्रयत्‍न करताच भारतीय सैन्याने टिटवाल भागात धडक देऊन दोन महत्त्वाची ठाणी ताब्यात घेतली आणि घुसखोरांची नाकेबंदी केली. पाकहद्दीतील हाजीपीर खिंडही हस्तगत केली. पाकला हा जबरदस्त धक्का होता. त्यांनी रणगाडे, एक ब्रिगेड लष्कर यांच्या साहाय्याने काश्मिरच्या दक्षिण भागात हल्ले चढविण्यास सुरुवात केली. त्यांचे पॅटन रणगाडे अमेरिकन बनावटीचे होते. छांब भागात भारतीय लष्कराची त्यांनी मोठी हानी केली. कारण हा भाग भारताचे दृष्टीने सोयीचा नव्हता. रणगाड्यांचे आक्रमण थोपविण्यास हवाईदलाच्या मदतीची गरज होती. कमांडर हरबक्षसिंग यांनी जनरल चौधरींशी संपर्क साधला. हवाई दलाच्या धडकेची गरज त्यांना प्रतिपादन केली. सूर्यास्तापूर्वी हवाई दलाने हल्ले करायला हवे होते. सरकारची त्यासाठी मुभा हवी होती. यशवंतरावांना हवाई दलाच्या कारवाईची गरज आणि तांतडी पटली. शास्त्रीजींकडून होकर मिळविण्याकरिता शास्त्रीजी त्वरित उपलब्ध होऊ शकले नाहीत. वेळ न घालविता चव्हाणांनी आज्ञा केली, 'हवाई दलाकडून (पान नं. ११८ व ११९ नाही आहे.)