• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ३२

अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे व यशवंतराव यांची दोनदा भेट झाली. तेव्हा भूमिगत आंदोलनासाठी पैशाची व्यवस्था करण्याची तयारी अण्णासाहेबांनी दाखवली आणि यशवंतरावांना मुंबईस येण्याचे आमंत्रण दिले. त्याप्रमाणे ते मुंबईत गेले तेव्हा अच्युतरावांची भेट होऊ शकली नाही, पण एस. एम. जोशी यांची झाली. अण्णासाहेबांनीच यशवंतरावांची डॉ. राम मनोहर लोहिया यांच्याबरोबर भेट घालून दिली. लोहियांनी उत्तरप्रदेश, बिहार इत्यादी भागांत चाललेल्या उठावाची माहिती यशवंतरावांना दिली. लोहियांनी यशवंतरावांना असेही सांगितले की, अगदी गरीब, मागासलेले, दलित अशा लोकांतही जा आणि त्यांच्यातून नवे कार्यकर्ते मिळवा. तासभर झालेल्या बैठकीचा यशवंतरावांवर बराच परिणाम झाला आणि लोकनेता कसा असावा याचे मूर्तिमंत चित्रच आपल्यापुढे उभे आहे असे त्यांना वाटले. मुंबईतच चार दिवसांनी काही कार्यकर्त्यांची बैठक होती. तिला हजर राहून मग परत जा, असे अण्णासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे यशवंतराव राहिले. बैठकीत काही कार्यकर्त्यांची नव्यानेच भेट झाली. यात कुलाबा जिल्ह्यातील कोतवाल हे लक्षात राहिले. त्यांनी विचारले की, घातपाताचे कार्य करताना काही शिक्षण देण्याची व्यवस्था कशी करता ? त्यावर किर्लोस्कर व ओगलेवाडीच्या कारखान्यातले काही कामगार कार्यकर्ते असून ते मदत करतात, अशी माहिती यशवंतरावांनी दिली. हेच कोतवाल पुढे हुतात्मा झाले.

यशवंतरावांवर दडपण आणण्यासाठी पोलिसांनी प्रथम त्यांचे बंधू गणपतराव यांना कारागृहात धाडले आणि नंतर वेणुताईंना. वेणुताईंना सहाएक आठवडे तुरूंगात ठेवले होते, पण त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सोडण्यात आले. याच काळात यशवंतरावांचे वडीलबंधू दादा. यांच्या पाठीला गळू आले म्हणून त्यांनी शस्त्रक्रिया करून घेतली व घरी आले तो आजार वाढला आणि त्यातच त्यांचे देहावसान झाले. ही सारी माहिती यशवंतरावांना कळण्यास काही दिवस लागले. या कौटुंबिक आपत्तींचा विचार करण्यास सवड नव्हती म्हणून यशवंतराव कामाला लागले; तेव्हा भूमिगत चळवळीचा नवा अध्याय सुरू झाला होता. त्याचे वर्णन करायचे तर ग्रामस्वराज्य स्थापन करण्याचा तो प्रयत्न होता. यासंबंधीचा बराच तपशील इतर भूमिगत कार्यकर्त्यांनीही लिहिला आहे. कासेगावकर वैद्य आणि डॉ. उत्तमराव पाटील यांनी गावागावांत केलेल्या कामाची आणि कार्यकर्त्यांच्या हालअपेष्ट्रांची माहिती दिली आहे. उत्तमराव खानदेशचे. तिथले काम संपवून ते सातारा जिल्ह्यात काम करू लागले होते. यशवंतरावांच्या वडील. बंधूचे निधन झाल्यानंतर वेणूताईंची प्रकृती ढासळत गेली. यशवंतराव पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी वेणूताईंना पुण्यात आणण्याची व्यवस्था केली व डॉक्टरांकडून प्रकृती तपासून घेतली. वेणुताई अशक्त होऊ लागल्या होत्या आणि त्या बेशुध्द होत. तेव्हा त्यांना फलटणला माहेरी पाठवण्यात आले, हे सर्व गुप्तपणे करणे ही आणखी जोखीम होती. यात यशवंतराव स्वत:च आजारी पडले आणि मग घोडनदी या गावी थोडे दिवस थांबले, तेव्हा बरे झाले. मग पुन्हा भूमिगत कार्याला सुरूवात झाली.

तथापि वेणुताईंची प्रकृती हा यशवंतरावांच्या काळजीचा विषय होता. तेव्हा फलटणला जाऊन चौकशी करावी व डॉक्टरकडून तपासून औषधोपचाराची व्यवस्था करावी म्हणून यशवंतराव फलटणला गुप्तपणे गेले. तथापि पोलिस मागावर होते. यामुळे त्यांना अटक झाली आणि त्यांनी तांबवे इथे केलेल्या भाषणाबद्दल खटला भरणार असल्याचे सांगितले. यात यशवंतरावांना सहा महिन्यांची शिक्षा होऊन येरवड्याला रवानगी झाली. या काळात फ्रेंच व रशियन क्रांतीबद्दल यशवंतरावांनी पाचसहा पुस्तके वाचली. सहा महिने झाल्यावर पुढचा हुकूम न आल्यामुळे यशवंतराव सुटून कराडला आले. तिथे बंधू गणपतराव कारागृहातून सुटून आले होते व क्षयरोगाचे दुखणे घेऊन आले होते. नंतर थोड्या दिवसांसाठी यशवंतराव व वेणुताई फलटणला गेले असता यशवंतरावांना पुन्हा अटक झाली. तीन महिने ते येरवड्याच्या तुरूंगात होते व मुदत संपल्यावर त्यांची पॅरोलवर सुटका झाली. या वेळची शिक्षा ही स्थानबध्दतेची होती. पॅरोलवर सुटल्यानंतर, घरी गेल्यावर यशवंतरावांना घरची परिस्थिती किती कठीण बनली आहे, याची कल्पना आली.