• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - २४

शिक्षेचा एक वर्षाचा काळ संपल्यावर यशवंतरावांची बदली विसापूर कारावासात झाली. तिथे ह. रा. महाजनी व स. का. पाटील आले होते. पाटील यांनी राजबंद्यांना पुस्तके मिळतील अशी व्यवस्था केली होती. विसापूरच्या या तुरूंगात गुजराती सत्याग्रहीही होते. त्यांच्याशी बोलताना गुजराती भाषेचा परिचय झाला. ह. रा. महाजनी यांनी एक दिवस अशी सूचना केली की, आपण वर्षभरात जी पुस्तके वाचत आलो, त्यांचे आपल्या मनावर काय परिणाम झाले व आपल्या विचारांना कोणती दिशा लागली, ते लोकांना समजावून सांगण्यापूर्वी बराकीतील मित्रांच्या मेळाव्यापुढे यशवंतरावांनी भाषण द्यावे. याप्रमाणे यशवंतरावांनी ‘गांधीवाद’ हा विषय निवडला व चाळीसएक मिनिटे भाषण दिले. भाषणाच्या अखेरीस यशवंतरावांनी खुलासा केला की, आपल्याला समजलेला गांधीवाद कसा आहे याबद्दल आपण बोललो, पण ती आपली जीवननिष्ठा आहे असे प्रामाणिकपणे म्हणणे शक्य नाही. गांधीवादाची सर्वात महत्त्वाची दोणगी, साध्यसाधन शुचिता ही आहे. ती मानवी जीवनात नित्य उपयोगी अशी आहे. गांधीजींचा राजकीय कार्यक्रम स्वीकारला वा न स्वीकारला तरी ही देणगी मोठी आहे. तत्त्व म्हणून नव्हे, तर व्यवहार म्हणून सुध्दा साध्यसाधनशुचिता हा सिध्दान्त उपयोगी पडणारा आहे. यशवंतरावांच्या या भाषणाचे महाजनी व निपाणीचे गांधीवादी कार्यकर्ते अनंतराव कटकोळ यांनी कौतुक केले.

यशवंतरावांच्या शिक्षेची मुदत १९३३ सालच्या मेमध्ये संपली व ते कराडला परतले. शाळा सुरू होण्याची वेळही आली. तेव्हा यशवंतरावांनी शाळेत दाखल होण्याचे ठरवले. अगोदरच त्यांची तीनएक वर्षे वाया गेली होती. त्यामुळे मॅट्रिकच्या वर्गात दाखल झाले तेव्हा ते वीस वर्षाचे झाले होते. अर्थात सार्वजनिक कार्याबद्दलचा उत्साह कायम होता. त्या वेळी गांधीजींनी तुरूंगातून सुटल्यावर हरिजन उध्दाराच्या कामास वाहून घेतले आणि मंदिरप्रवेशाचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाला खुद्द दलित समाजाचाच पाठिंबा नव्हता. तुमच्या विठ्ठलाला व रामाला भेटून आमचे पोट भरणार नाही, असे ते म्हणत. तेव्हा कोणता कार्यक्रम हाती घ्यावा, याचा विचार यशवंतराव व त्यांचे मित्र करू लागले. मग या सर्वानी निरनिराळ्या गावांत जाऊन दलित समाजातल्या लोकांशी चर्चा केली. मातंग व चांभार या वर्गात प्रतिसाद मिळाला, पण महार समाज दूरच राहिला. त्यांचे विचार डॉ. आंबेडकरांच्या लिखाणाने पक्के झाले होते. या स्थितीत कराड नगरपालिकेतल्या मोहिते या नावाच्या गृहस्थांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले, की आमच्या समाजातले लोक मिळवल्याशिवाय तुमच्या कार्यात यश येणार नाही. यानंतर यशवंतराव व त्यांचे मित्र यांनी कराड व इतर भागांत दलितांसाठी रात्रीच्या शाळा काढायचे ठरवले. अशा शाळेच्या उदघाटनास कोणीतरी मोठी व्यक्ती आणण्याचे ठरले आणि विठ्ठल रामजी शिंदे यांना आमंत्रण देण्याचा विचार पुढे आला. त्यांना आमंत्रण देण्यास यशवंतराव पुण्यास गेले. विठ्ठल रामजी यांनी यशवंतरावांची बराच वेळ चौकशी केली. आपल्याबरोबर हरिजनालाही घरी जेवायला आणावे लागेल, ही त्यांची एकच अट होती. ती यशवंतरावांनी ताबडतोब मान्य केली. कर्मवीर शिंदे यांचा ठरल्याप्रमाणे कार्यक्रम झाला आणि एक स्वतंत्र व्याख्यानही झाले. यशवंतरावांना या वेळी असा अनुभव आला, की स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेल्यांपैकी अनेकजण या कार्यक्रमापासून दूरच होते. कर्मवीर पुण्याला परत गेले आणि यशवंतराव रोज संध्याकाळी महार वस्तीत जाऊन शिक्षणाचे काम करू लागले. तथापि ते दोनतीन महिन्यांच्यावर चालले नाही. कारण शाळेत येणा-या प्रौढांची संख्या रोडावत जाऊन शाळा बंद करण्याचाच प्रसंग आला. आमच्यावर अन्याय करणारे तुम्ही लोक असल्यामुळे तुमच्याकडून आमचे काही होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे नेते आहेत. स्वबळावर आपली उन्नती करण्याचे शिक्षण त्यांनी दिले असून त्याप्रमाणे आम्ही जाणार असे उत्तर मिळाले. मग ही हकीगत यशवंतरावांनी कर्मवीर शिंदे यांना पत्राने कळवली आणि हा प्रयोग संपवला.

यशवंतराव १९३४ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर पुढे करायचे, हा प्रश्न आला. वडीलबंधूंनी शक्य ती मदत देण्याचे कबूल केले तरी त्यामुळे प्रश्न सुटणार नव्हता. तेव्हा राघूअण्णा लिमये म्हणाले, शंकरराव देव कराडला येत आहेत त्यांच्याशी बोलून पाहू. शंकररावांना आचार्य भागवत यांनी यशवंतरावांबद्दल माहिती दिली होती. पुढील शिक्षणाचा विचार राघूअण्णा यांनी काढला; तेव्हा ‘कशाला शिकता, त्यापेक्षा काही तरी काम हाती घ्या.’ कसले काम असे सांगितले. यशवंतरावांनी घरी आल्यावर विचार केला आणि आश्रमात न जाता, कोल्हापूरला महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला आणि तोच योग्य होता. मित्र गौरीहर सिंहासने यांनी सांगितले की, कोल्हापूरला जा, पुढची व्यवस्था आम्ही मित्रमंडळी करू. त्याप्रमाणे यशवंतराव कोल्हापूरला राजाराम महाविद्यालयात जूनमध्ये दाखल झाले.