यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका- विनायक पाटील

आठवणी यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या आणि कथन करणारे लक्ष्मण माने.  उत्तम पुस्तक होण्यासाठी आणखी काय हवे आहे ?

यात माने यांनी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पत्ररूपाने या आठवणी सादर केल्या आहेत.  खरे तर, हे कथन आहे सुप्रियाच्या पिढीसाठी.  सुप्रिया निमित्तमात्र आहे.

यशवंतरावांचा जीवनपट विस्तीर्ण आहे व विविध पैलूंनी नटलेला आहे.  त्यातील काही काळ व काही पैलू माने यांच्या वाट्याला आले आहेत.  ते त्यांनी अत्यंत संवेदनशील मनाने टिपले आहेत व पत्ररूपाने सादर केले आहेत.

सध्याच्या पिढीसाठी आवश्यक व उपयुक्त असे चव्हाणसाहेबांच्यावरील लिखाण या निमित्ताने झाले आहे.  यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने निर्माण झालेला हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.

ही पत्ररूप आठवणींची साठवण मराठी वाचकांच्या सदैव लक्षात राहील.


- विनायक पाटील