• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३४-१७१९२०१२-१

अरुणला आणि मला खरेच फार आश्चर्य वाटत होते.  बाबा वलणकरांसंबंधी साहेब आमच्याशी चर्चा करीत होते.  बाबासाहेबांपूर्वीचा कालखंड आणि चळवळ त्यांना समजावून घ्यायची होती.

आता ते माझ्याकडे वळले.  नेहमीसारखी चौकशी, विचारपूस झाली.  लक्ष्मण, माझ्या मनात असे आहे, की हे राजकारण; त्यातही धावपळ आता बंद करून तुमच्याबरोबर काम करावे.  आयुष्यात उरलेला वेळ या भटक्या-विमुक्तांसाठी काम करावे.  'बंद दरवाजा' ने माझ्याही मनाची कवाडे त्यांच्यासाठी खुली झाली आहेत.  आपण सातारला भटक्या-विमुक्तांची एखादी मोठी संस्था काढावी, त्यांचे सारेच रखडले आहे.  लक्ष्मण, मी असा विचार करतो, ज्यांचे शिक्षण झाले त्यांचे सारे काही झाले.  ज्यांचे शिक्षण रखडले, त्यांचे सारे जगणे रखडले.  ज्यांच्या शिक्षणाची आबाळ झाली, त्यांच्या जगण्याची आबाळ झालीच म्हणून समजा.  महात्मा फुले झाले नसते, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज झाले नसते तर माझी काय परवड झाली असती सांगा !  

साहेब, आपण कर्ते असताना भटक्या-विमुक्तांवर अन्यास कसा झाला ?  हे आदिवासी समाजातले लोक, बलुतेदारांच्या, ओबीसींच्या यादीत कसे काय गेले ?

लक्ष्मण, त्याचाही इतिहास आहे.  तुमचे म्हणणे खरे आहे.  मी काही त्यासाठी एक्स्क्यूज मागत नाही.  मीही अपराधी आहेच.  पण ज्या काळात या याद्या घटनेला जोडल्या गेल्या त्याकाळी मी नुकताच राजकारणात आलो होतो.  ज्युनिअर होतो.  आमचे कर्तेकरविते मोरारजी देसाई, भाऊसाहेब हिरे, गणपतराव तपासे होते.  त्यावेळी मी पार्लमेंटरी सेक्रेटरी होतो.  माझ्याकडे साधा फोन नव्हता.  राहायला जागा होती पण फोन करायला गणपतराव तपासे यांच्या बंगल्यावर मला जावे लागणार होते.  मी फोनसाठी गणपतरावांकडे जात होतो कारण ते कॅबिनेट मंत्री होते.  मी राजकारणात कुणाचे लांगुलचालन केले नाही.  लाचारीने उभा राहिलो नाही.  काही मिळवण्यासाठी काही केले नाही.  त्यावेळी माझा सल्ला कुणाला मी देणार होतो ?  पण जेव्हा बासष्ठ साली जवाहरलालजी सोलापूरला आले, सेंटलमेंटच्या त्यांनी तारा तोडल्या त्या राष्ट्रीय परिषदेचा मी साक्षीदार आहे.  पंडितजींचे भाषण आजही मला आठवते.  ते म्हणाले होते 'हा जन्माने गुन्हेगार ठरवणारा कायदा अत्यंत अमानुष आहे.  तो कायदा आपण नष्ट केला.  पण हे लक्षात ठेवा.  पिंजर्‍यातून सोडलेला पोपट फार लांब उडून जाऊ शकत नाही.  तो पुन्हा पिंजर्‍यावरच येऊन बसतो.  तसे नुसते अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमध्ये यांना समाविष्ट करून भागणार नाही.  त्यांच्यासाठी पुनर्वसनाचा वेगळा सब प्लॅन तयार करा.  यांचे फार मोठे योगदार स्वातंत्र्य चळवळीत आहे.  सारे स्वातंत्र्यसैनिक त्यावेळी सर्वात जास्त सुरक्षितपणे याच मंडळींमध्ये होते हे लक्षात ठेवा.  तातडीने यांच्यासाठी काहीतरी करा.'

मी तात्काळ या गोष्टीची दखल घेतली.  थाडे कमिशन नेमले आणि मी दिल्लीला गेलो.  लक्ष्मण, त्यावेळी मारुतराव कन्नमवार या भटक्या बेलदार समाजातल्या माणसाच्या हाती सत्ता देऊन मी दिल्लीला गेलो.  मराठा समाजातले अनेक पात्र उमेदवार बाशिंग बांधून उभे होते.  पण मी सत्ता जाणीवपूर्वक विदर्भातल्या अल्पसंख्य समाजातल्या माणसाला दिली.  त्यांच्या आकस्मात निधनाने रिकाम्या झालेल्या जागेवर वसंतराव नाईक या लमाण-बंजारा समाजातल्या तरुण शिक्षित माणसाच्या हातात बारा वर्षे महाराष्ट्र ठेवला.  आपल्या जातीचे भले आपला माणूस करील हे काही खरे नाही, तसे झाले.  मी त्यांना दोष देऊन रिकामा होऊ मागत नाही, मीही त्यांच्याएवढाच दोषी आहे.  त्याचेही परिमार्जन करायलाच पाहिजेल.  वेगळे बजेट करणे दूरच राहिले.  त्यांना अस्पृश्य आदिवासींच्या सवलती द्यायचे राहिले.  चार टक्के जागा कशाबशा दिल्या.  आणि त्यानंतर राजकारणाचे सर्वव्यापी स्वरूप हळूहळू लोप पावत निघाले.  जातींनी राजकीय रूप धारण केल्याचे मी आज रोज पाहतो आहे.  पूर्वी राजकारणात जाती होत्या.  आज जातींचे राजकारण झाले आहे.  त्यात हे भरडले गेले हे मला कबूल आहे.  म्हणूनच मी त्यांच्या शिक्षणाकडे वळण्याचे ठरवले आहे.  घटना, तिचे स्वरूप सारे माझे मी करेन, तुम्ही चिंता करू नका.

साहेब, हे काम माझ्याने होणार नाही.  मी असा झोळी खांद्याला अडकवून भणंग फिरणारा माणूस; ज्याला कोणतीही शिसत नाही.  अत्यंत बेशिस्त मनुष्य हा माझा पिंड, असले काम करणारा नाही.  आपण मला मोर्चे काढायला सांगा, मेळावे घ्यायला सांगा, सतरंजा अंथरणे, माईक लावणे, गर्दी जमा करणे, टाळ्या वाजवणे, नेते निघून गेले की रिकाम्या सतरंज्या उचलणे, झाडून काढणे, माईक गोळा करणे असल्या कामाचा माझा अनुभव.  संस्था काढणे, ती चालवणे यासाठी मी योग्य नाही.  तो माझा पिंड नाही.  मला हे कसे जमणार ?

कसे जमणार म्हणजे काय ?  मी आहे ना.  आपण सारे करू.  लक्ष्मण, आपला क्रूस आपल्याच खांद्यावर असतो.  इतरांच्या खांद्यावर आपला क्रूस जात नाही.  जो इतरांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.  तुमचे दुखणे तुम्हाला जेवढे समजेल तेवढे इतरांना समजणार नाही.  पर दुःख शीतल असते.  तेव्हा हे काम आपण करायचे.  मी तुमच्यासोबत आहे.  चिंता करू नका.  सारे नीट होईल.