• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र ३४-१७१९२०१२

पत्र - ३४
दिनांक १७-१०-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.


'उपरा'च्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन करून आम्ही परतलो.  मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न लटकून पडला होता.  त्याने आमच्या चळवळीतले लोक फार संतप्‍त होते.  चव्हाणसाहेब अर्थातच नामांतराच्या बाजूने होते.  त्या वादात ते फारसे बोलत नसत.  माझे सहकारी मित्र प्रा. अरुण कांबळे आणि मी साहेबांना भेटलो.  साहेबांनी आम्हाला सांताक्रुझच्या विमानतळावरल्या एका हॉटेलमध्ये बोलावले होते.  सेंटॉर या हॉटेलमध्ये ते उतरले होते.  आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असल्याने कामासाठी ते तामिळनाडूला जाणार होते.  त्यांचे लवकरचे विमान होते.  आम्हां दोघांना त्यांनी सकाळी सात वाजता बोलावले.  आम्ही सकाळी सकाळी साहेबांना भेटायला हॉटेल सेंटॉरमध्ये गेलो.  त्यांच्या जवळच्या कुणीतरी नातेवाईकाने दार उघडले.  काय काम आहे ?  साहेब कुणाला भेटणार नाहीत.  त्यांचे विमान थोड्या वेळात आहे असे म्हणून पुन्हा दार लोटू लागले.  साहेब आत उरकत होते.  त्यांनी दारातला हा संवाद ऐकला आणि धोतर नेसत नेसत दारात आले.  अरे येऊ दे त्यांना.  मीच बोलावले आहे.  साहेबांनीच सांगितल्यावर तो माणूस बाजूला झाला.  आम्ही सोफ्यावर बसलो.  चहा आला.  साहेबांनी विचारले, काय अरुण, काय चाललेय ?

साहेब, विद्यापीठाच्या प्रश्नाने लोक फार अस्वस्थ आहेत.  नामांतराचा प्रश्न लवकरांत लवकर सुटावा असे वाटते.  

साहेब उरकता उरकता आमच्याशी बोलत होते.  अरुण, त्यासाठी माझे मत आता महत्त्वाचे राहिलेले नाही.  राज्यकर्ते दररोज हास्यास्पद होत आहेत.  लेक असुरक्षित झाले आहेत.  प्रत्येकाला वाटते आपले काही खरे नाही.  सरकारचे वागणे-बोलणे फार जबाबदार असले पाहिजे.  गरीब असो की श्रीमंत, राज्य प्रत्येकाला आपले वाटले पाहिजे.  ही स्थिती आज नाही.  त्यामुळे मला वाटते आपण असे करावे.  नामांतर व्हायचे त्यावेळी होईल.  आपण काही हात जोडून बसू नये.  अरुण, तुम्ही एक संस्था सुरू करा.  मुंबईच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आपण आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे विद्यापीठ स्थापन करू.  मी तुम्हाला लागेल ती मदत द्यायला तयार आहे.  मला आता सत्तेत फारसा रस राहिलेला नाही.  आपण आपल्या हातून राहून गेलेली कामे करावीत असे सारखे मनात येते.  म्हणून तुम्हाला बोलावले.  

टाटा सामाजिक विज्ञान केंद्रासारखी त्याची रचना असावी.  तुम्ही घटना तयार करा.  जमिनीच्या शोधात राहा.  आपल्याला असे आधुनिक विद्यापीठ डॉ. बाबासाहेबांच्या नावाने मुंबईत सुरू करायचे आहे.  कोणत्याही वादात पडायचे नाही.

अरुणने साहेबांना अडचणी सांगितल्या.  साहेब म्हणाले, मी आहे ना तुमच्या पाठिशी, माझी जी काही पुण्याई आहे ती उभी करीन, त्याची चिंता तुम्ही करू नका.  मुंबईला बाबासाहेब राहिले.  चैत्यभूमी येथे आहे.  आयुष्यातला मोठा काळ त्यांनी या शहरात काढला.  नावलौकिक मिळवला.  देशाचे नेतृत्व केले.  त्यांच्या इतमामाला शोभेल असे संस्थात्मक काम करायचे राहून गेले.  तुम्हा तरुण मित्रांनी आता हे काम हाती घेतले पाहिजेल आहे असे मला वाटते.  अशी मोठी संस्था उभी करावी.  ज्ञानार्जनाचे, ज्ञानदानाचे काम ज्या शहरात बाबासाहेबांनी केले.  तेथे त्यांचे स्मारक ज्ञान मेरीटनेच होऊ शकते.  त्यांचे देशावर फार महान उपकार आहेत.  अरुण, मला बाबा वलणकरांची सारी लिखित साधने हवी आहेत.  सुरवा नाना टिपणीसांशी मी बोललो आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे चरित्र मला लिहायचे आहे.  साधनांची जुळवाजुळव मी करतो आहे.  त्याचे असे झाले, की डॉ. सविता जाजोदिया आणि डॉ. सय्यद असद अली हे नॅशनल बुक ट्रस्टच्या राष्ट्रीय चरित्रमालेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक संक्षिप्‍त चरित्र लिहिण्याची गळ घालीत होते.  माझ्या मनात अनेकदा हा विचार येऊन गेला होता.  पण मी आज-उद्या करीत हे काम रेंगाळले आहे.  ते मला करावयाचे आहे.  मी त्यांना तसा शब्द दिला आहे.  अरुण, तुम्ही म्हणाल राजकारणातल्या माणसाचा शब्द, तो दिला काय नि नाही दिला काय.  लोक समजून घेतात.  पण हे दोघे माझ्या मागेच लागले आहेत.  मी शब्दांचा फार पक्का आहे.  आपल्या शब्दाची प्रतिष्ठा आपण राखली नाही तर कोण राखील ?  शब्द काही नुसते सुटे शब्द नसतात.  त्या पाठीमागे भावना असते.  शब्दांना अर्थ असतात.  ते वार्‍यावर उडून गेले तर बोलण्यात कोणता अर्थ राहील ?  शब्द नुसते शब्द नसतात.  ते दुधारी शस्त्रासारखे आहेत.  त्यामुळे शस्त्रापेक्षा मला शब्द श्रेष्ठ वाटतात.  ते एकमेकाला जोडतात आणि तोडतातही; म्हणून ते फार जपून वापरले पाहिजेत.  शब्दांनी जखमा होतात.  त्या विसरता येत नाहीत.  ते शस्त्र आहे,  जपूनच वापरले पाहिजे.  मी. डॉ. जाजोदियाना शब्द दिलाय.  तुम्ही मला मदत करायची.  बाबासाहेबांच्या चरित्राचा फार गंभीरपणे अभ्यास करतो आहे.  त्यांचे सारे अंक मी मिळवतो आहे.  काही जुनी चरित्रे हवी आहेत.  त्यात वलणकरांचे चरित्र हवे आहे.  तु तुम्ही मला मिळवून द्या.