• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र १४-२३८२०१२

पत्र- १४
दिनांक २३८२०१२

चि.सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

मी आता फलटणला बराच रुळलो होतो.  माध्यमिक शाळेचं शिक्षण सुरू होतं.  काम करायचो.  चार पैसे मिळवायचो.  त्यानं घरी कसलाच त्रास नव्हता.  दिवस वेगानं बदलत होते.  अभ्यासातही बरी प्रगती होती.

ते साल दहावीचं होतं.  मित्रांबरोबर रविवारपेठेत खोली घेतली.  सातआठ मुलं एकत्र राहत होतो.  नारायण बोडके, रामदास रास्कर या वर्गमित्रांनी मला खोलीचं भाडं न भरता राहू दिलं.  आता अभ्यासाला थोडा शांत वेळ मिळू लागला.  तरीही मित्रांच्याच डब्यात जेवत होतो.  या मित्रांनी केलेल्या मदतीला तोड नाही.  लहान असताना निवडणुका, राजकारणामध्ये भाग घेत असे, पण शहरात कोण विचारतो ?  फार तर पोरांच्यात चर्चा असे कधीतरी.  त्यात जेबल्यांच्या वाड्यात आम्हांला थोडी मोठी खोली मिळाली.  आता तिथे राहू लागलो.  तो वाडा म्हणजे दोन मजली घर.  समोर रस्त्याला लागून रेशनिंग दुकान.  तेथे जेबले स्वतः दिवसभर असत.  भुतांसाठी प्रसिद्ध म्हणून कोणी त्या भुताटकीच्या वाड्यात राहत नसत.  पाठीमागं मोठ्ठा पिंपळ. पिंपळपानांची सळसळ नित्याची.  माडीवरही माझ्यापेक्षा वरच्या वर्गातली मुलं राहत होती.  पाचपन्नास विद्यार्थी एकत्र राहत.  सारे खेड्यापाड्यातून आलेले.  सार्‍यांचे डबे येत असत.  माझे त्यात भागून जात असे.  जातीचा त्रास इथे खूपच कमी होता.

जेबल्यांच्या वाड्याजवळच डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांचं घर होतं.  तेथे लोकांचा रोज राबता असायचा.  कृष्णवर्णीय शेलाट्या अंगाचा, पांढरी पँट, पांढरा हाफ शर्ट, पायाला छान बूट, डोक्याच्या केसांचा भांग त्यानं अतिशय काळजीपूर्वक पाडलेला असायचा.  अत्यंत टापटिपीत राहायचे.  डोळ्यांच्या चष्म्याच्या सोनेरी कडा, भेदक नजर, हसरा चेहरा, डोळ्यांत मिस्कील भाव.  जाणार्‍या-येणार्‍याला पोहोचवायला किंवा घरात घ्यायला दारात येत तेव्हा आम्हाला दिसत.  मागं एका पत्रात मी तुला सौ. वेणुताईंना पाहिल्याचं लिहिलं होते.  त्यावेळी त्या याच भोईटे यांचा प्रचार करीत होत्या.  एम.ए., पी.एच.डी. झालेला हा माणूस साधा लेखनिक म्हणून श्रीराम सहकारी साखर कारखान्यात नोकरीला होता.  कविता हा याचा आवडीचा विषय.  काही कविता एकत्र करून त्यांनी एक छोटासा कवितासंग्रह प्रसिद्ध केला होता.  खेडेगावातल्या गरीब छोट्या शेतकरी कुटुंबात वाढलेला.  घरी अठराविश्व दारिद्रय, नोकरी आणि कविता.  शिक्षणही पहिल्याच पिढीत आलेलं होतं.  स्वभाव अत्यंत शांत.  मनमिळावू, थोडेसे अबोल.  आम्हा पोरांना मोठे कुतूहल.  आम्ही त्यांना लांबूनच पाहायचो.  कधीतरी शहरातले मित्र दिलीपसिंह भोसले किंवा धनंजय भोसले आमच्या खोलीवर येत असत.  ते आले की राजकारणावर बोलत असत.  त्याचंही आम्हाला फार अप्रूप वाटे.  धनंजय भोसले तर माझा बॅचमेट होता.  तो स.रा.भोसले बापूंचा धाकटा मुलगा.  बापू बॅरिस्टर, राजाभाऊ भोसले यांचे वडील आमच्या शाळेच्या मॅनेजिंग बोर्डात.  घरी मोठी श्रीमंती.  त्या काळी धनंजय भोसले म्हणजे हिरो.  कडक इस्त्रीतले कपडे.  टोकदार अणकुचीदार टोपी.  ही श्रीमंतांघरची पोरं.  दिलीप भला मोठा उंचच्या उंच.  मी त्याच्यापेक्षा कितीतरी बुटका.  या पोरांच्या व्यक्तिमत्त्वाने आम्ही फार घाबरून असायचो.  प्रभुणेसरांमुळे मी सार्‍या शाळंतल्या शिक्षकांचा, मुलांचा आवडता विद्यार्थी झालो होतो.

एके दिवशी दिलीप, बाळू मेटकरी, धनंजय खोलीवर आले.  त्यांनी सर्वांनी कृष्णचंद्र भोईटे यांच्याकडे जायचं ठरवलं.  ते तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती होते.  घरापुढे कायम एक जीप उभी असायची.  आम्ही सारे घाबरत घाबरत त्यांच्या घरी गेलो.  दिलीपनं दाराची बेल वाजवली.  आतून कुणीतरी दार उघडलं.  या बसा !  म्हणाले.  आम्ही जाऊन सतरंजीवर बसलो.  तेवढ्यात पायजमा, बनियन अशा घरातल्या कपड्यातच भोईटेसाहेब बाहेर आले.  बैठकीच्या खोलीत आम्ही सातआठ पोरं.  दिलीप, धनंजयला ते ओळखत होते.  'काय धनू, काय काढलंत ?'  म्हणत चष्मा पुसत गादीवर बसले मांडी घालून.  'या खेड्यातल्या मुलांना तुम्हाला पाहायचं होतं.  ती इथं जेबलेवाड्यात राहतात.  रोज तुम्हाला लांबून पाहतात.  म्हटलं, चला तुमची ओळख करून देतो.'

'काय दिलीपराव, काय म्हणतात बाबा ?'  दिलीपचे बाबाही असेच उंचेपुरे.  हॉटेलचा व्यवसाय करत.  त्यांच्या ओळखी होत्या.  सभापतींनी आमच्या ओळखी करून घेतल्या.  आम्ही आमची नावं सांगितली.  'तुम्ही सभापती कसे झालात, ते सांगा.'  आमच्यातला एक जण म्हणाला.  ते मोठे रुबाबदार हसले.