• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

अभिनंदन ग्रंथ -महाराष्ट्राच्या राजकारणांतील समस्या - 3

भारतीय प्रशासनामध्ये महाराष्ट्रीय लोकांना वाढता वाव मिळावा आणि परप्रांतीयांचे आपणाबद्दलचे गैरसमज दूर होऊन आपणास त्यांचेशी सहकार्य करून विधायक कामगिरी करतां यावी, अशी मराठी जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. महाराष्ट्र राज्यनिर्मितींनतर ही अपेक्षा पूर्ण होण्यास अडचणहि नाही. आणि नव्या महाराष्ट्रराज्याने त्या दिशेने वाटचाल सुरुहि केली आहे. परंतु भारतीय जीवनाला निश्चित गति देण्याचे कार्यांत प्रभावीपणे भाग घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व प्रभावी पाहिजे, त्यामागे महाराष्ट्रसमाजाचा जागृत पाठिबा हवा. या गोष्टी साधणें हें सर्वस्वी महाराष्ट्रीय समाजामध्ये एकोपा आणि उत्साह निर्माण होण्यावर अवलंबून आहे, आणि यामध्ये महाराष्ट्राच्या नेतृत्वाची येत्या काही वर्षात खरी कसोटी लागणार आहे.

महाराष्ट्र समाजामध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक समस्या सोडविल्या पाहिजेत. सामाजिक क्षेत्रांत ब्राह्मण-ब्राह्मणे-तर-वाद आणि अस्पृश्यांचा प्रश्न यांमुळे प्रमुख समस्या निर्माण झाली आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये उद्योगधंद्यांची वाढ, सहकारी पद्धतीचा प्रसार, भूमिहीनांना शेती आणि सुशिक्षितांतील बेकारी हे मुख्य प्रश्न आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या तिन्ही विभागांचे-विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांचे- एकात्म्य साधणे ही मुख्य समस्या आहे. या सर्व समस्यांच्या मुळाशी लोकशाहीबद्दल निष्ठा वाढवून लोकशाही व्यवहाराला चालना द्यावयाची ही मूलभूत भूमिका आहे.

नवें नेतृत्व आवश्यक

नवमहाराष्ट्रापुढील या समस्यांची यशवंतरावांना पूर्ण जाणीव आहे असें गेल्या वर्षात अनेक ठिकाणीं त्यांनी केलेल्या भाषणांवरून स्पष्ट झाले आहे. आणि ही जाणीव ठेवूनच महाराष्ट्र राज्याचें धोरण ते आखीत असल्यामुळे या धोरणामध्ये जशी वास्तवता आहे तशीच प्रगतीची लक्षणेंहि आहेत. त्यामुळेच यशवंतरावांच्या नेतृत्वाबद्दल महाराष्ट्रांतील सर्व थरांतील लोकांना विश्वास वाटतो. विरोधी पक्षाचे पुढारी आणि विरोधी चळवळीचे नेतेहि त्यांच्या नेतृत्वाची मुक्तकंठाने प्रशंसा करतात ती यामुळेच.

खरी समस्या आहे ती या समस्यांची सोडवणूक करण्याची. यशवंतरावांचे नेतृत्व हें महाराष्ट्रामध्ये सर्वमान्य झालें तरच या समस्यांची जाणीवपूर्वक सोडवणूक करूं शकणारी लोकशक्ति उभी राहील. आज महाराष्ट्रांतील ब-याच लोकांना भीति वाटते ती यशवंतरावांचे नेतृत्व एकाकी असून ते दिल्लीला जाऊन महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाला मुकण्याची. वस्तुस्थिती अशी आहे की, विदर्भ-मराठवाड्यांतील लोक यशवंतरावांच्या नेतृत्वाची प्रशंसा करतात; परंतु मुंबई राज्याच्या प्रशासनाचा तिटकारा करतात. प्रशासनांतील अधिकारी यशवंतरावांच्या व्यवहारी भूमिकेचें आणि प्रशासनकुशलतेचें कौतुक करतात; परंतु काँग्रेस पक्षाच्या राज्यकारभाराबद्दल फारसें चांगलें बोलत नाहीत. विरोधी पक्ष यशवंतरावांच्या सौजन्यशील नेतृत्वाबद्दल व वास्तववादी दृष्टिकोनाबद्दल प्रशंसा करतो; परंतु महाराष्ट्रांतील काँग्रेसचें राजकारण सहकार्य करण्याइतकेंहि समंजसपणाचे नाही, असें समजतो. यावरून यशवंतरावांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग मोठा आहे हें जसें खरें, तसेंच यशवंतरावांना महाराष्ट्राच्या सर्व भागांतून आणि स्तरांतून मिळणारा पाठिंबा हा त्यांच्या अभावी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वास मिळेल असें वाटत नाही. आणि जनतेच्या जागृत पाठिब्याशिवाय महाराष्ट्राचे भारतामधील स्थान प्रभावी होणार नाही हें उघड आहे.
तेव्हा अनुकूल वातावरणांत जन्म पावलेल्या महाराष्ट्रास विचारी, समंजस आणि पुरोगामी नेतृत्व लाभून भारतीय समाजजीवनास यशाशक्ति हातभार लावूं शकेल असें स्थान मिळवावयाचें असेल तर महाराष्ट्रामध्ये यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकर्तें तयार होऊन पुढे येतील अशा दिशेने कार्य झालें पाहिजे. लोकशाहीच्या या युगामध्ये बहुजन समाजामधूनच नवें नेतृत्व पुढे येणें हे स्वाभाविक आणि स्वागतार्हहि आहे. परंतु या नेतृत्वाला नवमहाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी पेलतां आली पाहिजे. त्यासाठी या कार्यकर्त्यांची सांस्कृतिक उंची वाढली पाहिजे आणि त्यांची राजकीय जागृतीहि वाढली पाहिजे. महाराष्ट्रांतल्या सर्वच राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांच्या शिक्षणाला ( राजकीय त्याचप्रमाणे संघटनात्मक ) जरूर तेवढें महत्त्व दिलेलें नाही. यापुढे या प्रश्नाकडे दुर्लभ करणें अहितकारक ठरेल. काँग्रेस पक्षाबाबत नव्या कार्यकर्त्यांच्या शिक्षणाला यशवंतरावांनी अग्रहक्क दिला तरच ही समस्या थोड्याफार अवधीनंतर सुकर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रांतील काँग्रेस पक्षांत नसलेल्या सामान्य नागरिकांचे दृष्टीनेहि ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण जोपर्यंत रूढ पक्षपद्धतीमुळे काँग्रेस पक्ष अधिकारावर राहील तोपर्यंत या पक्षाच्या कार्यकर्त्यांची पातळी उच्च दर्जाची असावी असेंच कोणीहि म्हणेल.

नवें नेतृत्व बहुजनसमाजामधून येणें स्वाभाविक असलें तरी त्याचा परिणाम समाजाच्या कोणत्याहि घटकाला संधि नाकारण्यांत होतां कामा नये. कारण भेदभावामधून निर्माण होणारा अन्याय हा विफलतेची भावना वाढीस लावतो आणि असंतोषास जन्म देतो. त्याचा परिणाम लोकशाहीच्या पायावरच आघात करण्यांत होतो. शिवाय महाराष्ट्राला जी एकात्मता साधावयाची आहे ती जातीजातींमध्ये त्याचप्रमाणे प्रदेशा-प्रदेशांमध्येहि साधावयाची आहे. आणि यांपैकी कोणत्याहि घटकाला (जातीसंबंधी वा प्रादेशिक ) जर भावी महाराष्ट्रामध्ये समान संधि मिळण्याची खात्री नसेल तर समाजामध्ये एकात्मता निर्माण होणार नाही.

महाराष्ट्रामध्ये एकोपा साधण्याचे आणि उत्साह निर्माण करण्याचे कार्य बिकट असलें तरी कुशल नेतृत्वाला ते साध्य होण्याजोगें आहे. श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाकडून हें कार्य सिद्ध व्हावें, अशी अपेक्षा आहे. त्यांचे सहकारी तसेच त्यांचे विरोधक आणि आम मराठी जनता त्यांना या कार्यांत यशच चिंतील.