• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३८-१

‘‘अच्छा!, मग असू दे. इथं आम्हाला कोण चिंता? वेणूबाई सुचू देत नाही न् मलाही चैन पडत नाही. पुन्हा असं करू नको. स्वत: ये.’’ साहेबांनी फोन ठेवला. परमुलखात मी गडबडून जाऊ नये ही त्यांची इच्छा. त्यातून तोंडी लावण्यागत मला चिडवीत बरोबर जेवायची त्यांना हौस. तर साहेब गेले हाडबडून !...अण्णा मला रागावले. आई म्हटली, ‘‘अशी दिशा भूल करूनी’’ सगळं खरं. पण मी काय केलंवतं म्हणून हा राग चहूबाजूंनी? आलं हसू. दाबलं ओठात. केला विचार, ‘‘आपल्या भावाला आपली आठवण आहे तर !.. फिर देखा जायेगा !’’ बसले एकलीच स्वत:शी बोलत. सुखसंवाद साधीत, कितीतरी वेळ ! ... एकलीच ! ..

लोक विचारायची, ‘‘साहेब तुम्हाला कोण लागतात?’’ मी चटकन हसून विचारायची, ‘‘का बरं?’’ मग त्यांनी पुन्हा म्हणावं, ‘‘तुमची त्यांना फार काळजी. सारखी आठवण काढतात.’’ आणिक मी पण हुंकार भरावा.

तसं पाहिलं तर साहेब आमच्या लांबच्या नात्यागोत्यातले. पण सख्ख्यापेक्षा जवळचे. त्यातून मी त्यांच्या भाषेत ‘पोटभर’ शिकलेली नि हातात लेखणी खेळू देतेली. त्यामुळे धाकल्या भैनीगत त्यांच्याजवळ माझी शान ! म्हणून मग अधूनमधून चारदोन नवी कोरी पुस्तकं दिली न् एखादवेळ नवं कोरं पेन दिलं की, मनसोक्त हसून खुशीनं पोटाशी धरणारे साहेब मला कधी आमच्या कुटुंबाबाहेरचे वाटलेच नाहीत. म्हणून तर रागलोभाची कारंजी आमच्याकडे नेहमीच उसळायची. ‘‘कधी आपली आज्ञा आपण जनतेला करायची असते तर कधी जनतेची आज्ञा आपण मानायची असते’’ ही संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळचा पंडित नेहरूंनी ऐकवलेला मंत्र आम्ही साहेबांच्या न् आमच्या वागण्या-बोलण्यात ठेवायला मागं पुढं पाहात नसू.

आमच्या ह्या साहेबांना छानछोकीचा नाद जरा कमीच. त्यातून वस्त्रालंकारांच्या बाबतीत तर आणखीनच कमी. आमचं न् वेणूतार्इंचं या बाबतीत नेमकं उलटं धोरण! म्हणजे तसा छानछोकीतला नखरा आमच्या वा-यालाही नसला तरी नवीन नवीन दागिना करावा किंवा सुंदर सुंदर साड्या खरेदी करायचा नादिष्टपणा आमच्या ठायी मुरलेला.

तशी एकदा खूपच धमाल उडवून दिली आम्ही! काय झालेलं की, इंग्लंडची महाराणी एलिजाबेथ मुंबईला येतेय तर तिला महावस्त्र न् महाअलंकार भेट द्यावा ही भाषा निघालेली. साहेब मुख्यमंत्री. तर सोन्याचा कोल्हापुरी साज न् पैठणी द्यायचा बेत पक्का झाल्यासरशी आम्हाला वेणूतार्इंनी न् कुसुमताई वानखेडेंनी वेठीला धरलं. आधीचं ‘नणंद न् कळीचा आनंद’ हे ब्रीद वाक्य आमच्या एकी त्यांच्या मुखी रुळलेलं. त्यात त्यांनी भर घातली, ‘‘अगोदर आमच्या गळ्यात कोल्हापुरी साज आला तर बराय नाहीतर तुमचं बघून घेतो आम्ही दिवाणसाब !...सांगा जाऊन भावाला ! म्हणावं आधी घरातल्या महाराणीचा मानपान ! मग इंग्लंडच्या ! कळलं?’’ आणिक बसल्या की, दोघी पण संगनमतानं माझं डोकं भणाणून सोडीत ! हरे राम ! साहेबांना सोन्यानाण्याच्या खरेदीतला मनस्वी राग. ‘‘पाहिजेल कशाला हा सोस?’’ असं त्याचं म्हणणं न् ह्यांनी तर मला वेठीला धरलेली! आता? काय सांगावी कथा? गेले तशीच पक्क ठरवून न् घातलं साहेबांच्या कानावर असान असं आहे म्हणून ! बापरे ! रामा शिवा गोविंदा ! साहेब एवढे भडकले हे ऐकून की, त्यांनी साफ नकार देत माझी कानउघाडणी केली, ‘‘तुला नाही कळत ! त्या राणीला सरकारी भेट दिली जाईल. ह्यांचं कोण करील?’’

‘‘तुम्ही ! स्वत: तुम्ही !’’ मला पण जोर चढला. तशी साहेबांनी रागानं असं पाहिलं न् संतापून ते घरातून अशा झटक्यानं बाहेर पडले की, वाटलं आता आपलं कंबरडं ढिलं होणार!.. पण ह्या दोघी घरात दाराभिडून पाहात होत्या ना? साहेब बाहेर पडल्यासरशी त्या आल्या पुढं न् बोलल्या, ‘‘शाब्बास! आता कृती हवी प्रत्यक्षात!’’..

‘‘पण तुमचा तरी का हटवादीपणा?’’ साहेबांचा राग बघून सर्द झालेल्या मला पण राहावेना तर रोखली मी आपली नजर त्यांच्यावर! वाटलं गप्प बसतील. पण कुठलं काय? त्यांना आणखीनच जोर चढला, ‘‘भाऊ मोठ्ठा आहे ना? मुख्यमंत्र्याला एवढं कोडं पडावं?’’

झालं! आगीत तेल पडावं तसा मग मलाही जोर चढला न् मग मी पण साहेबांना त्यांच्या कचेरीत जाऊन सुनावले, ‘‘हे ऐकलं नाही तर त्या दोघी राणीच्या स्वागताला येणार नाहीत पण खूप त्रास उभा करतील घरात रुसून फुगून! ..तुम्ही विचार करावा हे चांगलं. मी तुमचं ऐकलं नाही कोयनेचा उंच कडा माने इंजिनियरांबरोबर जीपनं चढत हेलमेट घालून वीज निर्मितीची चाचणी घेतेवेळी?... ते किती अवघड काम! त्यापुढं हे काहीच नाही. असा काय खर्च येईल? ‘‘हो’’ म्हणा!’’..