परिशिष्ठ क्र. २
लोकनेते कै. यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट
जन्म : १२ मार्च १९१३, सातारा जिल्ह्यातील (सध्या सांगली जिल्हा) देवराष्ट्रे या गावी.
देवराष्ट्रे येथील प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण.
१९१८-१९ : वडील बळवंतराव चव्हाण यांचे प्लेगच्या साथीत निधन.
१९२७ : क-हाडच्या केंद्रीय शाळेतून व्हर्नाक्युलर फायनल परीक्षा पास. क-हाड येथील
टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश.
१९३१ : पुणे येथील नूतन मराठी विद्यालयातर्फे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत ‘ग्रामसुधारणा’ या
विषयावर पहिल्या क्रमांकाचे रूपये १५०.००चे पारितोषिक प्राप्त.
१९३०-३२ : असहकाराच्या (कायदेभंग) चळवळीत सहभाग व १८ महिन्यांच्या
तुरूंगवासाची शिक्षा.
१९३२ मे : तुरूंगातून सुटका
१९३४ : मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. कोल्हापूर येथे राजाराम महाविद्यालयामध्ये प्रवेश. (प्राचार्य डॉ.
बाळकृष्ण व प्रोफेसर ना. सी. फडके यांचा सहवास व मार्गदर्शन.)
१९३८ : इतिहास व राजकारण हे विषय घेऊन मुंबई विद्यापिठाची बी. ए. ही पदवी परीक्षा उत्तीर्ण.
१९३६-३८ : एम. एन. रॉय यांच्या विचारांची पकड.
१९४०-४१ : एल. एल. बी. परीक्षेत सुयश व वकिलीच्या व्यवसायास प्रारंभ.
२ जून ४२ : फलटण येथे विवाहबद्ध आणि भूमिगत.
९ ऑगस्ट ४२ : चळवळीस प्रारंभ, विशाल सातारा जिल्हा नेतृत्व महात्मा गांधींच्या ‘चेल जाव’
चळवळीत सामील.
१९४२ : क-हाड येथे भरलेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनातील परिसंवादाचे अध्यक्ष.
१९४२-४३ : सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत प्रवेश-संचालन व मार्गदर्शन. ऑगस्ट १९४२
ते एप्रिल १९४३ रूग्ण पत्नी वेणूताई यांची भेट, फलटण येथे आगमन व पोलिसांकडून अटक.
१९४३ : सर्वात थोरले बंधू ज्ञानोबा यांचे निधन.
१९४५ : तुरूंगातून सुटका.
१९४६ : असेंब्लीच्या पहिल्या निवडणुकीत दक्षिण सातारा मतदारसंघातून निवड.
१९४६ : एप्रिल १४ गृहखात्याचे पार्लमेंटरी सचिव म्हणून निवड.
१९४७ : डिसेंबरमध्ये बंधू गणपतराव यांचे निधन.
१९४८ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस.
१९५२ : कराड मतदारसंघातून विधीमंडळात फेरनिवड. पुरवठामंत्री म्हणून नियुक्ती.
१९५६ : सप्टेंबर २८, श्री. भाऊसाहे हिरे व श्री. नानासाहेब कुंटे यांच्यासमवेत नागपूर
करारावर स्वाक्षरी.
१९५४ : मुंबई राज्य पंचायत संघाची स्थापना.
१९५६ : १ नोव्हेंबर विशाल द्वैभषिक मुंबई राज्याची स्थापना व मुख्यमंत्री म्हणून निवड.
१९५७ : ३० नोव्हेंबर प्रतापगडावर शिवस्मारकाचे पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन.
१९५८ : सप्टेंबर अखिल भारतीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर निवड.
१९५९ : मार्च, शस्त्रक्रिया व ४२ दिवसांची विश्रांती.