यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ५०

सत्ता हातात आल्यावर शिवाजी युनिव्हर्सिटी, मराठवाडा युनिव्हर्सिटी स्थापन होण्यात त्यांना सिंहाचा वाटा होता. सत्यशोधक चळवळ व म. फुले यांच्यामध्ये लोकांत शिक्षण प्रसार करावयाचा हा जो विधायक मुद्दा होता, तो चव्हाणांना मान्य होता. तो त्यांनी पकडून राजर्षि शाहू महाराज-राजाराम महाराज यांच्या इच्छा पु-या केल्या. ठराविक उत्पन्न असलेल्यांना फी-माफी झाली व बाराशेच्या आत उत्पन्न असलेल्याना जी फीमाफी दिली गेली त्यामुळे बहुजन समाजातील मुलांना शिक्षण घेता आले. शिक्षण प्रसाराच्या क्षेत्रात घोडदौड करण्यात त्यांना बाळासाहेब देसाई यांचेही साह्य झाले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था निघावी व वाढावी या कामी यशवंतरांवांच्या प्रेरणा होत्या.

मराठी भाषिक समाज नागपूर-व-हाड, मराठवाडा व महाराष्ट्र (पश्चिम) यामध्ये विभागला होता. याचे एकच राज्य (प्रांत) तयार करण्यात चव्हाणांचा अंतिम मोठा वाटा होता व त्यांच्या काळात महाराष्ट्र राज्य एक मोठे प्रगत राज्य होत गेले. मराठी भाषिक सर्व समाज एकाच प्रांतात करणे हे मोठ्यातले मोठे समाजकारण म्हणजे वरील सर्व सर्वांगीण क्षेत्रे यांचा समावेश होतो. पण समाजकारणात सामाजिक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

चव्हाणांचा समाजिक दृष्टीकोन समजण्यासाठी पुढील परिच्छेद योजित आहे. “मी पक्का संघविरोदी होतो. (कायद्याचे पुण्यातील विद्यार्थी) संघाकडे झुकलेले होते. ते जरी आर. एस. एस. वाले वाटले तरी मोठे सज्जन तरूण होते. देसात चाललेल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची आर. एस. एस. वाल्यांची एक वेगळी नजर होती. हे त्यावेळी माझ्या विशेष लक्षात आले.’ (चव्हाणांचे मित्र बिडेश कुलकर्णी हे वादविवाद प्रसंगी आर. एस. एस. ला ‘खाकसार’ म्हणून संबोधित) खाकसार हे द. हैद्राबादेत जी खाकसार एकांगी चळवळ चालली होती. तिचे नाव होते-खाकसार ‘शब्दाची टोपी आमच्या संघवाल्यांना छान बसत होती.’ असे यशवंतराव चव्हाण लिहितात. चव्हाणांना रा. स्व. सेवक संघाविषयी माहिती जरूर होती. सातारा जिल्ह्यात क-हाड व वाई यासाठई क्षेत्रांची ठिकाणे म्हणजे आर. एस. एस. यांचे बालेकिल्ले होते.

चव्हाणांच्या जीवनावर राष्ट्रीय सभेचे जे व्यापक संस्कार झाले. ते प्रभावी ठरले. इतर समकालीन प्रवाहांनी त्यांच्यावर मात केलीच नाही. चव्हाण इतर प्रवाहांचा अभ्यास मात्र करीत असत. १९३४-३५ सालचे ते दिवस असतील. डॉ. हेडगेवार यांचे क-हाडला व्याख्यान झाले. चव्हाणांना ‘डॉ. हेडगेवार यांचे व्यक्तिमत्व प्रभावी वाटले. पण ‘आसिंधू सिंधू’ ही जी हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांनी केली होती. त्या व्याख्येप्रमाणे जो असेल तोच हिंदुस्थानचा खरा निष्ठावान नागरिक’ असे मत हेडगेवारांनी मांडले. काँग्रेसच्या दृष्टीकोनातून चव्हाणांनी डॉ. हेडगेवार यांना काही प्रश्न विचारले. वरील व्याख्येत बसत नाहीत अशी कोट्यवधी माणसे या देशात आहेत. त्यांचे काय करावयाचे? हेडगेवारांनी सांगितले की, ‘जेव्हा प्रश्न उभा राहिल तेव्हा पाहता येईल.’ “मी समजलो की फक्त एक विशिष्ट वर्गाच्या लोकांची फॅसिस्ट संघटना बनवायची आहे. आपल्याला यात काही कर्तव्य नाही. तेव्हापासून आर. एस. एस. म्हटले, की मी चार पावले दूर राहिलो आहे. माझ्या संपर्कात येणा-या कार्यकर्त्यांना आणि मित्रांना मी त्या विचारापासून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.” (पृ. २१८)