यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ५

कृतज्ञता-

सदर पुस्तकास सत्यशोधकी वारसा असलेले रॉयवादी कार्यकर्ते श्री. विश्वासराव नाईकनवरे, पुणे यांनी समर्पक व ‘रा. ना.’ च्या लेखांना न्याय देणारी प्रस्तावना देऊन उपकृत केले आहे. चव्हाण कुटुंबियांतर्फे मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. त्यांचे प्रोत्साहन आमच्या पुढील कार्यास बहुमोल असेच आहे. त्यांच्याप्रत घेऊन जाणारे श्री. अशोक नाईकवाडे (औरंगाबाद) यांचे सुद्धा आभार. प्राध्यापक डॉ. प्रकाश रा. पवार, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांचे सहकार्य वादातील आहे. त्यांनी सदरच्या पुस्तकास समर्पक, प्रदिर्घ असा पुरस्कार/अभिप्राय दिला. त्यामुळे मला मोलाचे मार्गदर्शन झाले. त्यांच्या सुविद्य पत्नी व डॉ. पवार आता माझ्या लेख संकलनाच्या कामाचे एक अविभाज्य भाग झाले आहेत. मी अनेकवेळा वेळोअवेळी त्या उभययतांना अनेक गोष्टीत मार्गदर्शन विचारतो. ते देण्यास हे कुटुंब तत्पर असते. त्यामुळे काम सुकर होते. त्यांनी दिलेला पुरस्कार वाचकांना आवडेल असाच आहे. त्यांचे ऋण व्यक्त करून आभार मानतो.

तसेच या संकलनाच्या पाठीमागे एक अदृष्य असा हात आहे, तो म्हणजे रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विस्वस्त डॉ. बाबा आढाव यांचा. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच ‘रा. ना.’ चे लेख पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचा खटाटोप सातत्याने चालू आहे. त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करेन. रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माझे थोरले बंधु रविंद्रनाथ, अन्य विश्वस्त माझे धाकटे बंधु शरदचंद्र व माझी सुविद्य पत्नी सौ. वैशाली चव्हाण यांचे सहकार्य व पाठिंबा वादातील आहे. त्यांचेही आभार मानतो.

या पुस्तकाची मुद्रणे तपासण्यास माझी ज्येष्ठ कन्या सौ. निलांबरी खोत, भाची कु. गौरी काटे व प्रा. डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड) ह्यांनी सहकार्य केले. या सर्वांचा मी मनापासून कृतज्ञ आहे. पुस्तकाच्या रचनेस मे. अतुल टाईपसेटर्स यांचे सहकार्य लाभले. पुस्तक प्रिंटींगचे काम मे. जयकुमार ऑफसेट प्रा. लि. यांनी अतिशय सुबक केले. त्याबद्दल मी जयकुमार शहा, श्री. अतुल शहा व त्यांचे सहकारी यांचा अत्यंत आभारी आहे. मुखपृष्ठावरील छायाचित्रांचे सुबक रेखाटन व रंगसंगती श्री. मिलिंद जोशी, अनुपम क्रिएशन, पुणे यांनी आपुलकीने सांभाळली. त्यांचा ऋणनिर्देश करणे मोलाचे आहे.