• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ५५

शिवाजी महाराजांसंबंधी चव्हाणांना अतोनात आदर होता. शिवाजीने सर्वसामान्य मराठे जमा केले. तसेच यशवंतरावांनी प्रतिष्ठित व सुसंस्थापित लोकांपेक्षा सामान्यांतून अनेक कार्यकर्ते व पुढारी तयार केले. हा एक त्यांच्या समाजाकारणाचा पैलू होता. “संघटना करावयाची झाल्यास माणसे सांभाळावी लागतात” हे चव्हाण म्हणाले. “ राजकारणांचा अर्थ अर्थकारण (Economics) म्हणजे अर्थाचे आधारे समाजशास्त्राची धारणा एवढाच आहे. समाजाची धारणा व्हावी म्हणून अर्थशास्त्रासारखे शासनशास्त्राचेही तत्त्व राजकारणात समाविष्ट होते.” असा राजकारणाचा अर्थ अस्पृश्यांचे राजकारण या विषयावर बोलताना कर्मवीर शिंदे यांनी दिलेला आढळला (भा. अस्पृश्यतेचा प्रश्न. दुसरी आवृत्ती, महाराष्ट्र शासनाने प्रकाशन १९७६)

“शेतीच्या अर्थशास्त्राची प्रगती व्हावी म्हणून अनेक साखर कारखाने संस्थापित व्हावेत म्हणून चव्हाणांचे प्रयत्न झाले. यामुळे शेती व शेतक-यांत थोडीबहुत संपन्नता दिसू लागली. समाज पालटलेला आढळतो. म्हणून राजकारण-समाजकारण-अर्थकारण यांची ताटातूट करता येत नाही.

गुणानां गुणि: वेत्ति|

तर्कतीर्थ जोशी सन १९५४ च्याही पूर्वी साहेबांविषयी (यशवंतरावांना साहेब म्हणून संबोधिले जाई) म्हणाले होते की – ‘चव्हाण अजून मोठे व्हावयाचे आहेत.’ पुढे मोठे होत गेले व वरील भाष्य खरे झाले.

राजकारणात चढउतार असतो. चव्हाणांनी टीका-निंदा व विरोध पचविला; अर्थात विवाद्य असत. पण आता विवाद्य नाहीत. त्यांनी अकस्मात व अवेळी जग सोडले व लोक त्यांच्या जमेची बाजू पाहू लागले आहेत. त्यांची गुणोपासना व्हावी. समाज हा त्याच्यामध्ये जे मोठे लोक होऊन जातात. त्यांचा परामर्ष त्यांच्या मरणानंतर जास्ती घेतो. मृत्यू अशी जागृती करितो. पण जिवंतपणी चव्हाणांना त्यांच्या लोकांकडूनच जास्ती विरोध झाला. त्यांच्या अगोदर त्यांचे पुष्कळ अनुयायी (आय) काँग्रेसमध्ये गेले. महाराष्ट्रीयन लोकांनी दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्रीय नेत्याच्या मागे उभे राहण्यापेक्षा स्वत:चाच जास्ती विचार केला. महाराष्ट्रीयांचे ऐतिहासिक दोष पुन्हा जाणून घ्यावयाचे झाल्यास (म्हणजे आत्मपरीक्षणासाठी) चव्हाण चरित्राची चिकित्सादेखील उपयोगी होते. लोकमान्यांनादेखील शेवटी महाराष्ट्रातच जास्ती विरोध झाला. चव्हाणांशी झालेल्या चर्चेत चव्हाम म्हणाले की- ‘मराठा समाज कधी संघटित होत नाही; व यदाकदाचित झाला तर तो कोणाला ऐकत नाही.’

चव्हाणांची योग्यता विशेषकरून त्यांच्या हयातीत उच्चभ्रू पांढरपेशी विवेकवंत समाजाने जाणली. तरी त्यांना त्यांच्याशी मुकाबला करावा लागला. उदा. ‘खेर यांनी मंत्रिमंडळात, बहुजन-समाजातील कर्तबगार आणि ख-या अर्थाने बुद्धिवादी अशा नेत्यांचा समावेश केलाच नव्हता.’ खेर व मुरारजी देसाई यांची युती होऊन मातृभाषेच्या अभिमानाच्या नावावर शिक्षणातून इंग्रजी नाहीसे करण्याचा चाणाक्ष प्रयत्न केला. खुद्द यशवंतराव हे नेमस्त व संयमी असतानाही त्यांना केवळ पार्लमेंटरी सेक्रेटरी करण्यात आले! मग शेकरराव मोरे-केशवराव जेधे यांना दूर ठेवण्यात आले. यांत नवल नाही. एक परीने असे म्हणता येते की, ना. खेर यांच्या वरील सारख्या अनेक प्रतिगामी धोरणांमुळे महाराष्ट्रात शे. का. प. ने जन्म घेतला. खेर यांच्यामुळे दुभंगलेला महाराष्ट्र यशवंतरावांनी पुढे एकत्र करण्याचा प्रयत्न केला व तो बराच यशस्वी झाला.

“यशवंतराव – इतिहासाचे एक पान” नामक चरित्रात लेखक रामभाऊ जोशी यांनी देखील खेरांवर टीका केली आहे.