• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ५४

मुंबई राज्याच्या विधीमंडळाच्या निवडणुकीसाठी चव्हाणांनी तरूण मित्र आत्माराम बापू पाटील यांचे नाव सोमणांना सुचविले. त्यावर दे. भ. सोमण (सातारा) यांनी उत्तर दिले की-... ‘निवडणुकीसाठी उमेदवार हा वडिलधारा, पोक्त ज्याचे नाव सर्वमान्य आहे आणि जो निवडणुकीसाठी येणारा मोठा खर्च करू शकेल...’ असा हवा.

चव्हाण सोमणांच्या उत्तराने निराश झाले! शेवटी वल्लभभाई पटेल यांचेपर्यंत जाऊन आत्मराम पाटील यांची उमेदवारी चव्हाणांना कायम करून आणणे भाग पडले व आत्मराम बापू यांना चव्हाणांनी निवडूनही आणले. (पृ. १७७-१७८) ‘कृष्णाकाठ’ या आत्मचरित्रातील मूळ भाग वाचकांनी वाचावा. चव्हाणांचा विशेष असा की- कोणत्याही वरीलसारख्या घटनांना ते जातियवादाचा रंग न देता राष्ट्रीय व व्यापक आणि तात्त्विक परिभाषा वापरून उद्देश साध्य करीत. म्हणून सोमण, गाडगीळ, देव, देवगिरीकर वगैरेंसारख्या विचारवंतांना त्यांची बाजू लक्षात घ्यावी लागे. चव्हाणांची भाषा, वक्तव्य व लेखन भारदस्त असल्यामुळे विचारवंतात व साहित्य क्षेत्रात ते चमकले. सत्यशोधकी ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रांतिक क्षेत्रातच ते राहिले असते तर चव्हाण हे ‘यशवंतराव’ झाले नसते. कै. बाळासाहेब देसाई यांची ओळख करून देताना देसाई हे सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळींपैकी होते असे चव्हाण नमूद करितात (पृ. २२६) पण यांनाही त्यांनी काँग्रेसेमध्ये घेऊन सातारा जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष केले. पुढे शे. का. प. चे श्री. यशवंतराव मोहिते मंत्री झाले. असंख्य उदाहरणे देणे सुकर आहे की – बहुजन समाजातील व ग्रामीण भागातून पुढे आलेली माणसे, यशवंतरावांचे नेतृत्व नसते तर पुढे सत्तेवर आली नसती. पण फारच थोड्यांनी देखील यशवंतरावांच्या समान होण्याचा किंवा त्यंच्याहीपेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नेतृत्वाचा बरा-वाईट फायदा घेण्यात आला.. ज्यांनी महाराष्ट्र पुढे आणला. त्यांपैकी यशवंतराव फार महत्वाचे ठरतात.

यशवंतरावांचे देहविसर्जन झाले तरी त्यांचे मरणोत्तर जीवन आता सुरू झाले आहे व यशवंतरावांवर अभ्यास चालू आहे. हा लेख एक असाच परिपाक आहे. केवळ विभूतिपूजा-व्यक्तिपूजा करण्याचा उद्देश बिलकूल नाही. पण त्यांचे पैलू जे स्मरतात ते येथे शब्दांकित केले आहेत. विवेचनाला आठवणींची जोड दिली आहे. उदा. दिल्लीच्या भेटीत, चर्चेत चव्हाण म्हणाले की- ‘सत्यशोधक चळवळ जशी झाली तशीच पुन्हा होणार नाही.’

चव्हाणांचे ‘कृष्णाकाठ’ आत्मचरित्र व त्यांच्याशी झालेली दिल्लीस प्रत्यक्ष गाठभेट, त्यात व्यक्त झालेले सामाजिक मुद्दे यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे. चव्हाणांना माणुसकीचा गहिवर फार होता. माझी एक सून दिल्लीस तिच्या निवासस्थानी बाथरूममध्ये पडून, तिचा पाय मोडला. तिला आम्ही स्वत:चा खर्च करून ‘ट्रीटमेंट’ दिली व ती बरी झाली. या संबंधाने यशवंतरावांना वरील घटना माहिती झाल्यावर म्हणाले की- ‘एवढा खर्च करीत बसण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे आले असता तर तुम्हाला मी एवढा खर्च करू दिला नसता.’ दिल्लीत महाराष्ट्र मंडळाचे चव्हाण अनेक वर्ष अध्यक्ष होते. महाराष्ट्रय व इतरही माणसांची त्यांनी कितीतरी कामे केली. याचा शोध घेतल्यास फार लोकांना त्यांनी उपकृत केल्याचे आढळेल. नुकतेच दिवंगत झालेले इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी गरिबीत दिवस काढले. त्यांचे साधेसुधे कपडे पाहून, चव्हाणांनी स्वत:चे पाचशे रूपये त्यांना नीट पोशाखार्थ दिले. दत्तो वामन पोतदार यांना शिवाजी चरित्र लिहण्यासाठी मोठी रक्कम दिली होती. पण त्यांच्याकडून हे कार्य झाले नाही! हे दुर्दैव होय!!