• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ५६

यशवंतरावांचे लेखन- भाषा सुबोध- प्रसन्न व भारदस्त आहे. विचारधन त्यांनी मागे ठेवले आहे. त्यांचे भाषण चालू असताना, ते असंख्य शेतकरी – मजूर व श्रमजीवी लोकांना समजत असे. बायाबापडी देखील भाषणे ऐकत.

यशवंतराव दलितांचे मित्र होते. मराठा महासंघाच्या राखीव जागा विरोधी पवित्र्यास त्यांनी कधीच पाठिंबा दिला नाही.

महर्षी शिंदे ‘आध्यात्मिक’ होते. एवढे सांगून त्यांनी त्यांच्यावरील भाष्य थांबविले. चव्हाणांना ‘अध्यात्मप्रधान’ म्हणता येत नाही. तरी त्यांचा व महर्षी शिंदे यांचा जो थोडा संबध आला तो पुढे त्यांनी दलितांची बाजू घेऊन त्यांना नानाविध सुविधा प्राप्त करून देण्यास स्फूर्तिप्रद वाटला.

कर्मवीर शिंदे यांचे मत असे होते की – बहुजन समाजाने व अस्पृश्य समाजाने राष्ट्रीय प्रवाहातून दूर न जाता आपआपली उन्नती करून घ्यावी. ब्राह्मणेतर व ब्राह्मण, अस्पृश्य व स्पृश्य असे भेद न करिता सहकार्याने वागावे म्हणजे हे प्रश्न सुटतील. अलगपणाने सुटणार नाहीत. चव्हाणांनी शिंदे यांची इच्छा सत्ता हातात आल्यावर पुरी करण्याची शर्थ केली. पराकाष्ठा केली व मराठा-मराठेतर भेद देखील वाढू दिला नाही. कित्येकजण सत्तेला दुय्यम मानतात. पण सत्तेचा सदुपयोग केला तर सत्ता शोभून दिसते. स्वातंत्र्यात सत्ता व तिचा चांगला वापर हा मुख्य मुद्दा आहे. प्रशासकीय पात्रता असल्यामुळे चव्हाणांनी माणसे जोडून स्वत: भ्रष्टाचारविरहित राहून व तिची इभ्रत राखली. हा एक आदर्श आहे. प्रत्यक्ष लोकव्यवहार पाहिला तर लोक सत्तेवरच्या माणसांना मानतात. सत्तासंन्यास फारसा फलद्रूप होण्याचा चालू काळ नाही. लो. टिळक म्हणत असत की – “आधी राजकीय” म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा योग्य अर्थ घेतला तर असे म्हणता येते की – राजकीय सत्ता आल्यावर जनहिताची अनेक कामे करता येतात. गुलामगिरीत हे शक्य नव्हते. आता स्वातंत्र्यात भारताने जी प्रगती केली यावरून हे विधान एका अर्थाने सत्य वाटेल. नैतिक –हासाचे चित्र चोहीकडे दिसते हे खरे. पण विकास झालाच नाही असे नव्हे. इंग्रजच पूर्ववत् असते तर भारताचे नवे चित्र तयार झाले नसते. राजकीय सत्ता शिवाजी, राजर्षि शाहू महाराज, सयाजीरावव यशवंतराव चव्हाण यांनी लोकोद्धारार्थ वापरली. सत्ता वापरणा-यांच्या पात्रतेवर सर्व काही अवलंबून असते. चव्हाणांच्या दिल्लीतील निवासस्थानातील दिवाणखान्यात लोकमान्यांचा मोठा फोटो होता. इतरही शिवाजी वगैरे देशभक्तांचे फोटो होते. लोकमान्यांचा फोटो पाहून त्यांची टिळकांविषयींची भक्ती निदर्शनास आली. भाग्येकरून चव्हाणांना स्थिर सरकार लाभले. यामुळेदेखील त्यांना लोकांची सामाजिक प्रगती करता आली. आता यापुढे सर्वच अवघड दिसते. पंडित नेहरू व चव्हाण यांचा काळ गेला.

म. फुले व शाहू महाराज यांच्या शिक्षणप्रसारक उद्देशात यशवंतरावांनी मनस्वी भर घातली. कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे यांचा सत्कार दि. २७/४/१९८२ रोजी सातारा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरील सभागृहात चव्हाणांच्या हस्ते झाला. यावेळी बापूजी साळुंखे यांचे प्राप्त आजारीपण पाहून चव्हाणांना किती वाईट वाटले व गहिवर आला हे त्यांच्या चर्येवरून मला व अनेकांना जाणता आले. चव्हाम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शिक्षणखात्याच्या बजेटात कित्येक लाख रूपये खर्च होण्याचे राहिले होते. कै. ए. जी. पवार यांचा त्यांनी सल्ला घेतला व वेळेवर हे काम श्री. बापूजी साळुंखे करतील असे कै. पवारांनी चव्हाणांना सांगितले. यानंतर चव्हाणांनी ही खर्च व्हावयाची मोठी रक्कम स्वीमी विवेकानंद शिक्षण संस्थेस दिली. हल्ली या संस्थेच्या अनेक केंद्रावर ज्या तिच्या इमारती दिसतात, त्या या मोठ्या अनुदानातून बांधण्यात आल्या.