• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ५७

‘यशवंतराव चव्हाण-इतिहासाचे एक पान’ नाम चरित्र श्री. रामभाऊ जोशी यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे. भारताच्या दृष्टीने चव्हाणांचे कार्य म्हणजे इतिहासाचे एक पान फार तर होईल. पण महाराष्ट्राच्या इतिहासाला चव्हाणांच्या चरित्रासाठी व कामगिरीसाठी अनेक पाने द्यावी लागतील.

मला तरी येथे या केवळ एका लेखासाठी अनेक परिच्छेद योजावे लागले आहेत.

आठवणी या महत्त्वाच्या आहेत व असतात. माजा त्यांच्याशी जो अल्पस्वल्प पण सामाजिक महत्त्वाचा परिचय झाला, त्या आठवणी येथे सा-या उपयोगात आणल्या आहेत.

१९६८ साली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत अंतर्गत कारणामुळे मोठे मतभेदाचे वादळ सातारा जिल्ह्यात उठले. त्यावेळी वाई जि. सातारा येथे घडत असलेल्या उद्रेकाची हकीगत मी दिल्लीला चव्हाणांना कळविली. पत्राची पोच आली. चव्हाणांचा विशेष म्हणजे त्यांना पत्र पाठविले की ते उत्तर देत, असा अनुभव आला.

पुढे वरील संस्थेची घडी बसावी म्हणून चव्हाणांनी एक लवाद नेमिला. यामुळे उद्रेक थांबून जैसे थे अवस्था प्राप्त झाली. चव्हाण समन्वयवादी होते. प्रसंगानुसार, कालानुसार परिवर्तन करून, मागील सर्व विसरून पुढे गेले व पुढे जात. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संवर्धनात त्यांचा मोठा भाग होता. जनतेच्या शिक्षणाचे कार्य करणा-या दोन मोठ्या संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था व विवेकानंद शिक्षण संस्था होत.

वाई येथील महर्षी शिंदे विद्या मंदिराचा उद्घाटन समारंभ १९५६ सील यशवंतराव यांच्या हस्ते झाला. त्यांच्या समवेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. महर्षी शिंदे यांचे तैलचित्र १९७३-७४ साली वाई नगरपालिकेत चव्हाणांच्याच हस्ते लावण्यात आले. अशा काही समारंभात त्यांचा जवळून परिचय झाला. एवढेच. चव्हाणांच्या फार समीप मी आलो नव्हतो, हे खरे. तरीसुद्धा मी विश्वकोश वाई कार्यालयातील संपादकांची पगारवाढ व्हावी म्हणून कर्मचारी संघटनेच्या अर्जासह प्रकरण त्यांच्याकडे पाठविले होते. या पाठविलेल्या पत्राची पोचही आली. इतक्यांत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद वसंतदादा पाटील यांजकडे गेले. चव्हाणांना आशा होती की, वसंतराव पाटील यांच्याद्वारे जरूर ती कार्यवाही करता येईल. पम तांत्रिक अडचणीमुळे हे काम झाले नाही. कार्यवाही व्हावी अशी त्यांची इच्छा होती, हे दिसून आले.

मी निरनिराळ्या नियतकालिकांमधून समाज प्रबोधनाच्या दृष्टीने अनेक वर्षे लिहीत आलो आहे. दिल्लीला साता-याचे डॉ. बाबा सुखटणकर आले होते. ते चव्हाणांना भेटावयास गेले होते. डॉ. सुखटणकर हे चव्हाणांच्या ओळखीचे होते. त्यांच्याकडे ते माझे आप्त असल्याने माझी तब्येत वगैरे कशी काय आहे, याविषयी यशवंतरावांनी चौकशी केली असे चव्हाणांना भेटून आल्यानंतर डॉ. सुखटणकर यांनी आम्हास सांगितले. खाजगी वाटणा-या दिल्लीच्या आठवणी ज्या त्या लेखात दिल्या आहेत. १९८१ मधील वरील भेट होती. नंतर जानेवारीला इंदिरा गांधी यांच्या संबंधीचा उल्लेख निघाला होता. “इंदिरा गांधी बदलत नाहीत” असे चव्हाण म्हणाले. पण लगेच ते आय काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे वाटले नव्हते.