• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (60)

दुसरा धोका आहे, तो 'सामाजिक व राजकीय बदल हे हिंसेशिवाय घडणार नाही,' अशी दृढ श्रद्धा असणा-या लोकांचे प्रमाण कमी आहे व ते असंघटित आहेत. परंतु या प्रश्नाचा गंभीरपणे व साकल्याने विचार न झाल्यास सार्वत्रिक हिंसाचार करण्याइतके त्यांचे सामर्थ्य वाढू शकेल, हे आपण विसरून चालणार नाही. या संदर्भात लोकशाहीच्या मार्गाने समाजवादी रचनेची शपथ घेतलेल्या राजकीय पक्षांवर जास्त जबाबदारी आहे. असे जातीय दंगे केवळ सरकारी सामर्थ्याने नाहीसे होणार नाहीत; तर त्यासाठी लोकांचे मनपरिवर्तन केले पाहिजे. तसेच हिंसाचारावर विश्वास ठेवणा-या ध्येयप्रणालीपासून लोकांना परावृत्त करावयाचे असेल, तर ज्या लोकमानसात अशा हिंसात्मक ध्येयवादाचा प्रभाव पडतो, त्याच्यावर लोकशाहीचे परिणामकारक संस्कार करीत राहिले पाहिजे. लोकशाही पद्धतीची श्रेष्ठता लोकांना पटवून दिली पाहिजे. सामाजिक न्याय व समता यांचे आश्वासन देणा-या समाजवादी शक्तीवर दृढ श्रद्धा असलेली लोकशाहीच अशा हिंसाचारी ध्येयप्रणालीशी मुकाबला करू शकेल.

येत्या दहा वर्षांत राजकीय पक्षामध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडतील, यासंबंधी मी हेतुत:च काही सांगितले नाही. कारण, आपल्या पक्षाखेरीज इतर पक्षांत काय घडेल, हे सांगणे कठीण असते. तथापि, राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीत कोणता बदल होणे आवश्यक आहे, हे स्थूलमानाने सांगू इच्छितो. चौथ्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर भारतीय राजकारणावरील एकपक्षीय प्रभुत्व कमी झाले. किंबहुना नाहीसे झाले, असे सांगण्यात येते. अर्थात १९६७च्या निवडणुकीनंतर भारतीय राजकारणात गुणवत्तेच्या दृष्टीनेही काही बदल झाले, हे नि:संशय आहे. येत्या दशकात जी उद्दिष्टे राजकीय पक्षांना साधावयाची आहेत, त्यांच्या मनाने बहुपक्षीय सरकारे किंवा संमिश्र सरकारे यांचा प्रश्न गौण समजला पाहिजे.
गेल्या दोन दशकांमध्ये ज्या नव्या सामाजिक व आर्थिक शक्ती निर्माण झाल्या, त्यांना सामावून घेण्यासाठी भारतातील राजकीय पक्षांना आता ध्येयप्रणालीची स्पष्टता व त्यांच्याशी सुसंवाद अशा कार्यक्रमावर भर द्यावा लागणार आहे. १९६७ नंतर घडलेल्या स्थित्यंतराचे हे मर्म आहे. या प्रक्रियेमुळेच काही पक्षांत अंतर्गत स्थित्यंतरे वेगाने घडत आहेत व काहीमध्ये अद्यापि तेवढा वेग आलेला नाही, हे आपण पाहतो आहोत. त्यामुळेच पक्षांतर्गत शिस्तीत थोडासा ढिलेपणा आला आहे. हा ढिलेपणा शिस्त असावी, की नसावी, या मतभेदातूनच निर्माण झाला आहे, असे मानणे चुकीचे ठरेल. मूलभूत व तातडीचे प्रश्न सोडविण्यासाठी नवे मार्ग शोधले पाहिजेत, असे सांगणा-या मतप्रवाहांचे दडपण पक्ष-संघटनेवर येते, हे पक्षबंधनाच्या लवचीकपणामुळे शक्य होत आहे. याच प्रक्रियेतून गेल्या काही वर्षांत पक्षांतर सुरू झाले आहे. येत्या दशकात सर्व राजकीय पक्षांना आपली दिशाहीनता टाकून देऊन सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांची निश्चिती व अंमलबजावणीचा सुस्पष्ट आणि अनुक्रमबद्ध कार्यक्रम यांच्याकडे आपला मोहरा वळवावा लागेल. विविध राजकीय पक्षांतील हे परिवर्तन कदाचित योजनापूर्वक घडेल किंवा काही प्रमाणात पक्षाबाहेरील किंवा अंतर्गत शक्तीच्या दडपणामुळे घडेल. परंतु एक निष्कर्ष निश्चित काढण्यासारखा आहे, तो असा, की सुस्पष्ट ध्येयवाद व निश्चित कार्यक्रम हा जनेतेसमोर ठेवला नाही, तर राजकीय पक्षपद्धतीलाच धोका पोचण्याचा संभव आहे.