• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

भूमिका-१ (61)

आज जो सर्वत्र गोंधळ दिसत आहे, त्यातूनही एक आशादायक प्रवाह मला दिसतो. तो म्हणजे सर्व राजकीय पक्षांत बदलत्या परिस्थितीचे समीक्षण, पृथक्करण व आत्मचिंतन करण्याची प्रवृत्ती प्रबळ झाली आहे. या सर्वांचा परिणाम होऊन येत्या दहा वर्षातील राजकारण हे जनतेच्या आर्थिक व सामाजिक प्रश्नावर आपले लक्ष केंद्रीभूत करील, असे  मला वाटते. त्यामुळे पक्षापक्षांच्या केवळ विचारांतच नव्हे, तर आचारांतही परिवर्तन घडेल, असा माझा विश्वास आहे.

अनेक लोकांना सध्याच्या बदलत्या व आव्हानात्मक परिस्थितीपुढे भारतातील लोकशाही तग धरू शकेल, की नाही, याबद्दल प्रामाणिक शंका वाटते. देशातील हिंसाचार व संसदीय लोकशाहीचा उघडउघड धिक्कार करणा-या मतप्रणालीचा जो प्रभाव आज पडत आहे, त्यामुळे अनेक लोक शंकाकुल झाले आहेत. विशेषत:, गेल्या दोन अडीच वर्षांतील घटना, विधिमंडळातील पक्षांतरे व बेशिस्त वर्तणूक यांमुळे राजकीय निराशावाद निर्माण होत आहे. आपल्या देशातील नव्या लोकशाहीच्या अस्तित्वास या सर्व गोष्टी घातक ठरतील, हे मी नाकारत नाही. परंतु दोन दुष्काळानंतर निर्माण झालेल्या आर्थिक व सामाजिक तंग परिस्थितीतही १९६७ साली सार्वत्रिक निवडणुका शांतपणे पार पडल्या आणि मोठ्या प्रमाणात मतदान झाले, ही घटना माझ्या दृष्टीने अधिक बोलकी आहे. तसेच १९६९ मधल्या चार राज्यांतील मध्यावधी निवडणुका शांत रीतीने पार पडल्या, हेही विसरून चालणार नाही. लोकशाही शासनाच्या लोक-व्यवहारात सार्वत्रिक निवडणुकांना जे सामाजिक स्थान आहे, ते लक्षात घेता, भारतीय लोकांची निवडणुकीतील शांततामय वागणूक त्यांच्या लोकशाहीवरील दृढमूल श्रद्धेची द्योतक मानली पाहिजे. १९६७ मध्ये राजकीय पक्षांत काही घटनाविषयक निर्णयामुळे तीव्र मतभेद झाले होते. केंद्र-राज्य संबंधांवर किंवा राज्यपालांच्या अधिकारांसंबंधी राजकीय वादळेही निर्माण झाली होती. तरीही सामान्यत: देशात सर्वत्र शांतताच नांदली.

मला वाटते, की अशा संकलित व दूरदर्शी दृष्टिकोणातून सद्य:स्थितीचे आपण मूल्यमापन केले, तर फारसे निराश होण्याचे कारण नाही. किंबहुना, मला तर असे दिसते, की ज्या राजकीय पक्षांनी घटनात्मक राजकारणाला प्रखर विरोध केला, ते आता हळूहळू संसदीय शासनपद्धतीच्या शिस्तीशी स्वत:च्या राजकीय वर्तनाचा मेळ घालू लागलेले आहेत. अर्थात अशा पक्षांना त्यांच्या पूर्वनियोजित राजकीय सिद्धांतामुळे संसदीय शासनपद्धतीचा उघड अंगीकार करणे सोपे ठरणार नाही; पण त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे मात्र नि:संशय. म्हणूनच भारतीय लोकशाहीची मृत्युघंटा वाजते आहे, अशासारख्या भावनाप्रधान घोषणांनी मी सचिंत होत नाही. मला स्वत:ला भारतीय लोकशाहीचे रोपटे लहान, पण रसरसलेले आहे, असे वाटते व लहानशा वादळाने ते पडेल, अशी भीती मला तरी वाटत नाही.