• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- ' त्याच्या वाटेतून बाजूला व्हा ! '

' त्याच्या वाटेतून बाजूला व्हा ! '

डॉ. अनिल अवचट हे विख्यात लेखक व पत्रकार आहेत. माणसांविषयी त्यांना अपार कुतुहल आहे आणि वेगवेगळ्या सामाजिक व आर्थिक स्तरातील लोकांच्या जीवनशैलीविषयी त्यांनी विपुल लिखाण केले आहे. ' साधना ' साप्ताहिकासाठी डॉ. अवचट बलुतेदारांची पाहणी करीत होते. त्यांचे मित्र वसंत देशपांडे हे तेव्हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठात काम करीत होते. ते डॉक्टरांना म्हणाले, ' तू करीत असलेले संशोधन समाजोपयोगी आहे. अशा प्रकारच्या संशोधनासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अनुदान देत असते. तू एक काम कर, या कामाचा प्रोजेक्ट बनवून विद्यापीठाला सादर कर. ' त्याप्रमाणे अवचटांनी विद्यापीठाला प्रस्ताव सादर केला. विद्यापीठाने सादर केला. त्यावेळी एक कडक प्रतिमेचे माजी प्राचार्य तिथे कुलगुरू होते. अवचटांचा प्रबंध समाजशास्त्रीय नाही, या कारणास्तव त्यांनी तो नाकारला. साहजिकच डॉ. अवचट नाराज झाले. आपण अहोरात्र कष्ट करून तयार केलेल्या संशोधन निबंधाची विद्यापीठाने साधी दखलही घेऊ नये याचे त्यांना वाईट वाटले. असेच काही दिवस निघून गेले. मौज प्रकाशनाने तो शोधनिबंध पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याची तयारी दर्शविली, पण त्यासाठी विद्यापीठाची परवानगी आवश्यक होती. अवचटांनी जेव्हा विद्यापीठाला शोधनिबंध प्रसिद्ध करण्याची परवानगी मागितली तेव्हा तीही नाकारली गेली. हा उघड उघड अन्याय होता. अवचट खूप निराश झाले. त्यावेळी यशवंतराव टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती होते. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुण्यात आलेले असताना शेवटचा उपाय म्हणून डॉ. अवचट त्यांना भेटले. प्रांजळपणे सगळी हकीकत सांगितली. त्यांना वाटले, यशवंतराव 'बघू ' , ' बोलू ' असे मोघम आश्वासन देतील. पण यशवंतरावांनी थेट फोनच उचलला. कुलगुरूंना लावला. अत्यंत कडक शब्दात ते म्हणाले, ' तो मुलगा त्याचा निबंध बाहेर प्रसिद्ध करतोय ना ? तुमची कसली हरकत ?' कुलगुरू म्हणाले, ' पण त्यामुळे चुकीचा पायंडा ( प्रेसिडेन्स ) पडेल.'

' काय आतापर्यंत कधी प्रेसिडेन्स बदलले नाहीत का ? हे तर चांगलं काम आहे. याच्यासाठी तुमचा तो प्रेसिडेन्स मोडा आणि त्याच्या वाटेतनं बाजूला व्हा.'

एका तरुण संशोधकाच्या समाजोपयोगी संशोधनात अडथळा निर्माण करणा-या कुलगुरूंना देखील यशवंतरावांनी खडे बोल सुनावले. कारण त्यांना युवकांविषयी व नवीन ज्ञानाविषयी आस्था होती.