• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव-विरोधासाठी विरोध नाही !

विरोधासाठी विरोध नाही  !

सन १९७७ साली आणीबाणी संपल्यावर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला व जनता पक्षाचे सरकार आले. यशवंतराव लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते झाले. गेली तीस वर्षे ते सत्तेत होते. आता प्रथमच विरोधी बाकावर बसण्याची वेळ त्यांच्यावर आली. तरीही ही नवी भूमिका ते चोख बजावत होते. त्यावेळी मधु दंडवते रेल्वेमंत्री होते. दंडवतेंनी एकदा संसदेत रेल्वेचे बजेट मांडले. त्यावेळी बजेटसंबंधी विविध नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील युवा नेते शरद पवार गॅलरीत बसले होते. दंडवतेंनी रेल्वे प्रवासाचे दर वाढवले होते. दरवाढीचा प्रस्ताव बरेच दिवस देशापुढे होता पण निवडणुका जवळ आल्यामुळे गरज असूनही काँग्रेसच्या सरकारने दर वाढवले नव्हते. दर वाढविणे आवश्यक आहे हे यशवंतरावांना माहीत होते. पण ते आता विरोधी पक्षाचे नेते होते. बजेट सादर केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्याची प्रतिक्रिया घ्यायला पत्रकार थांबतात. चव्हाण साहेब काय प्रतिक्रिया देतात हे ऐकण्यासाठी शरद पवार गॅलरीतून उठून त्यांच्याकडे निघाले. पण ते तिथे पोहोचण्यापूर्वीच यशवंतरावांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली होती. ते म्हणाले, ' दर वाढविण्याच्या निर्णयामुळे लोकांना यातना होतील, पण हे करायला पाहिजे होते. कारण हे केल्याशिवाय गत्यंतर नव्हते आणि म्हणून त्यांनी हे केलेले आहे.'

नंतर यशवंतरावांच्या गाडीतून त्यांच्या घरी जाताना शरदराव म्हणाले, ' साहेब, तुम्ही विरोधी पक्षाचे नेते म्हणून, ' सामान्य माणसाच्या दृष्टीने दरवाढ व्हायला नको होती, ' अशी प्रतिक्रिया द्यायला हवी होती.

तेव्हा यशवंतराव म्हणाले, ' शरद , केवळ विरोधासाठी विरोध करणे मुळीच बरोबर नाही. प्रशासनाचे स्वत:चे काही प्रश्न असतात. शेवटी राज्य चालविताना काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात.'