• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

कथारुप यशवंतराव- कोंडी तोडणे हेच आपले काम !

कोंडी तोडणे हेच आपले काम !

' नवाकाळ ' चे संपादक नीळकंठ खाडीलकर यांनी सांगितलेली ही आठवण . आपल्या वृत्तपत्राच्या अधिक प्रती छापता याव्यात म्हणून खाडिलकरांनी नवीन रोटरी मशीन विकत घ्यायचे ठरवले. पण हे मशीन जर्मनीहून मागवायचे असेल तर केंद्र सरकारचा परवाना आवश्यक होता. त्यासाठीचा अर्ज घेऊन खाडिलकर दिल्लीला गेले. संबंधित अधिका-याला तो अर्ज दिला. अधिकारी म्हणाला, ' तुमचा सध्याचा खप दहा हजारच आहे. तुम्ही अजून एक फ्लॅटबेड मशीनच घ्या.'

खाडिलकर म्हणाले, ' आमच्याकडे रोटरी मशीन नाही, म्हणून आमचा खप दहा हजार आहे. पण मशीन आल्यावर आमचा खप वाढेल.' अधिका-याला हे उत्तम पटेना. खाडिलकरांचा आत्मविश्वास त्यांना अनाठायी वाटला. ते म्हणाले, ' तुम्ही अर्ज करा, पण मी तो मंजूर करणार नाही.' खाडिलकरांचा हिरमोड झाला. त्यांनी अर्ज दिला व दुस-या दिवशी सकाळी यशवंतरावांना फोन लावला. साहेब तेव्हा केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते. खाडिलकर फोनवर म्हणाले, ' यशवंतरावजी, मी फार अडचणीत आहे. मला तुम्ही पंधरा मिनिटे वेळ द्याल का ?'
' जरुर, जरुर ! आत्ताच या, मी आहे तास दीड तास ! '

खाडिलकर साहेबांच्या दिल्लीतील घरी गेले. साहेबांचे सचिव श्रीपाद डोंगरे बाहेरच होते. ते म्हणाले, ' या , पाचच मिनिटांत तुम्हाला साहेबांकडे नेतो. त्यांनी मला तसे सांगून ठेवले आहे.' थोड्याच वेळात खाडिलकर आत गेले. मोठ्या कष्टाने त्यांनी अश्रू आवरले आणि सर्व हकिकत सांगितली. पुढे म्हणाले, ' शाळा- कॉलेजमधील स्कॉलरचे करियर सोडून मी पत्रकारितेत आलो आहे. जगायचे असेल तर, चांगल्या खपाच्या वृत्तपत्राचा प्रमुख म्हणून जगायचे असा माझा निर्धार आहे. यामध्ये माझा सर्वनाश झाला तरी मला चालेल. या अधिका-याने त्याची काळजी का करावी ?'


यशवंतराव शांतपणे ऐकत होते. खाडिलकरांचे बोलणे थांबल्यावर त्यांनी काही मिनिटे विचार केला व कोणाला तरी फोन लावला. फोनवर साहेब म्हणत होते, ' ही अशी कोंडी आहे. त्या अधिका-याचे म्हणणे त्याच्यापरीने ठीक असेलही, पण एका बुद्धिमान आणि धाडसी तरुणाची अशी कोंडी झालेली मला चालणार नाही. शिवाय हा मुलगा त्याच्या सर्वनाशालाही तयार आहे. मग त्याला अडथळा का करायचा ? आपल्या समाजात ही अशीच कोंडी आहे. ती कोंडी फोडणे हेच आपले काम. कृतज्ञता तर आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत.' मग फोन ठेवून साहेब खाडिलकरांना म्हणाले, ' यंग मॅन, गो अहेड. आजच दुपारी बारा वाजता जा आणि त्या अधिका-याला भेट.'

त्याप्रमाणे दुपारी खाडिलकर पुन्हा त्या अधिका-याला भेटले. तो म्हणाला, ' मी तुमचा अर्ज मंजूर करेन पण मला ठराविक रक्कम द्यावी लागेल.' खाडिलकरांचा चेहरा पडला. लाच देणे त्यांच्या तत्त्वात बसत नव्हते. दुस-या दिवशी पुन्हा ते साहेबांकडे गेले. साहेबांनी सगळी हकिकत ऐकली व म्हणाले ,  ' गो अहेड ! काही कोणाला द्यायचे नाही. दोन तीन दिवस थांब आणि परवाना घेऊनच मुंबईला जा.' तिस-या दिवशी खाडिलकरांना डोंगरेंचा फोन आला. ' तुमचा परवाना तयार आहे. ऑफिसमध्ये जाऊन ताब्यात घ्या.'