• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १७१

साहेबांनी आपल्या सहकार्‍यांसोबत चर्चा केली.  मला दिल्लीला जाणे कसे आवश्यक आहे याची कल्पना दिली.  माझ्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र घडवायचा आहे.  पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा सांभाळायची आहे.  एकसंध राहून काम करावयाचे आहे.  ज्येष्ठ सहकार्‍यांसोबत विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्याची चाचपणी केली.  बाळासाहेब देसाई, कन्नमवार, आबासाहेब खेडकर यांची प्रबळ महत्त्वाकांक्षा दिसली.  बर्वे व पी. के. सावंत या कार्यक्षम मंत्र्यांचाही विचार साहेब करीत होते.  संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी कन्नमवार यांनी जो त्याग केला त्यांच्या त्यागाचा विचार करणे साहेबांना क्रमप्राप्‍त आहे.  साहेबांचा कल एकसंध महाराष्ट्र ठेवून प्रगतिपथावर घेऊन जाणार्‍या समक्ष सहकार्‍याच्या हाती सत्ता सोपविण्याचा आहे.  महाराष्ट्राला सांभाळू शकणारं नाव साहेबांना कन्नमवार हेच दिसू लागलं.  साहेबांनी नेहरूजींशी चर्चा करून वरील नावांपैकी एक नाव निश्चित करण्याचं ठरविलं.  या सर्व नावांबद्दल नेहरूजींनी साहेबांसोबत साधकबाधक चर्चा केली.  कन्नमवारांच्या शिक्षणाबद्दल चर्चा केली.  शिक्षण कमी असले तरी प्रशासनाचा अनुभव असून माझ्या मंत्रिमंडळात दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री आहेत अशी पुस्ती साहेबांनी कन्नमवार यांच्याबाबतीत जोडली.  नेहरूजींनी तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, त्यातून नवीन प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घ्या, असं साहेबांना सांगितलं.  साहेबांनी नेहरूजींच्या सल्ल्यानं कन्नमवार यांचं नाव महाराष्ट्र विधिमंडळाच्या नेतेपदासाठी निश्चित केलं.  

मुंबईला येऊन तीन-चार दिवस लोटत नाहीत तोच १४ नोव्हेंबरला दिल्लीत नेहरूजी साहेबांना देशाचे संरक्षणमंत्री म्हणून जाहीर करतात आणि महाराष्ट्रात १४ नोव्हेंबरला पुण्यातील ऐतिहासिक दिल्ली दरवाजासमोर साहेबांचा ऐतिहासिक सत्कार आयोजित केलेला.  याच दिल्ली दरवाजाच्या समोरील मैदानातून छत्रपतींचे पेशवे, मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीच्या दिशेने आगेकूच करीत असत.

या निरोप समारंभात बोलताना साहेब म्हणाले, ''सह्याद्री प्राण नसलेला काळा पाषाण नाही.  महाराष्ट्राच्या शौर्याचे व परंपरेचे प्रेरणास्थान आहे.  या सह्याद्रीपासून आम्ही स्फूर्ती घेऊन महाराष्ट्राची निर्मिती केली.  या स्फूर्तीच्या जोरावर सह्याद्रीचे पुत्र लढता लढता मरण पत्करतील; पण कुणाचीही गुलामगिरी स्वीकारणार नाही.  सह्याद्री आपल्या काळ्या पत्थराचा कोट तयार करून शत्रूला नामोहरम करील.''

साहेबांच्या या भाषणाने प्रभावित होऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील विरोधक साहेबांचा जयजयकार करीत होते.  दिलदार पुणेकरांनी साहेबांना भावी यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.  दुसर्‍या दिवशीच्या सर्व मराठी वर्तमानपत्रांत 'हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री निघाला' अशा अर्थाचे मथळे झळकले.

देशाच्या स्वातंत्र्यावर प्रथमच चीनने घाला घातला.  देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.  या संकटकाळी महाराष्ट्राच्या भूमिपुत्राची देश संरक्षणमंत्री म्हणून निवड करतो याचा थेट संबंध इतिहासातील शौर्याच्या भावनांशी घातला जाऊ लागला.  देशातील सामान्यांतील सामान्य माणसाला हे स्वातंत्र्य आमचं आहे, हा स्वतंत्र देश माझा आहे ही भावना जागृत झाली.  इतिहासात एका कवीनं स्वराज्याशी सामान्य शेतकरी किती एकरूप झाला याबद्दल निर्भीडपणे एक वर्णन केलं आहे.