• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १७०

दिल्ली विमानतळावरून थेट 'तीनमूर्ती भवन' या नेहरूंच्या निवासस्थानी पोहोचले.  साहेब आल्याचा निरोप नेहरूजींना पाठविला.  तत्काळ नेहरूजींनी साहेबांना आत बोलावलं.  नेहरूजींसोबत शास्त्रीजी तिथे हजर होते.  नेहरूजी जरा कष्टी दिसले.  आपली एक एक ठाणी पडल्याच्या वार्ता येऊन धडकताहेत.  स्वातंत्र्यावरील या संकटाचा मुकाबला कसा करावा याची खलबतं सारखी तीनमूर्तीवर चालू आहेत.  नेहरूजींना क्षणाची उसंत नाही.  त्यांनी लगेच साहेबांना विचारलं.  

म्हणाले, ''घेतला का तुम्ही निर्णय येथे येण्याचा ?''

''मला अजूनही असं वाटतं, माझं इथं येणं खरंच आवश्यक आहे का ?  तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर माझी येथे येण्याची तयारी आहे.'' साहेब.  

''आता विचार करायला आपल्याला वेळ नाही.  तुम्ही इथं आलंच पाहिजे.'' नेहरूजी.  

''यशवंतजी, आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे.  या संकटकाळी तुम्ही नेहरूजींची पाठराखण केली पाहिजे.  तुमच्यासारखा सक्षम मुख्यमंत्री दुसरा कुणी नाही.  परत तुम्ही लढवय्या प्रांताचे प्रतिनिधी आहात.''  शास्त्रीजी.

''तरीपण अजूनही मला असं वाटतं, तुम्ही या निर्णयाचा पुनर्विचार करावा.  वाटल्यास मी आज दिल्लीत थांबतो.  सकाळी परत मुंबईला जाईल.'' साहेब.

''त्यात पुनर्विचार करण्यासारखे काही नाही.  तुम्हाला माझ्या अडचणीची कल्पना नाही.  टी टी. कृष्णम्माचारी व बिजू पटनाईक यांना वाटतं मी त्यांना संरक्षणमंत्री करावं.  मी तुमची निवड विचारपूर्वक केली आहे.''  नेहरूजी.

''आपल्या इच्छेचा मी अनादर करणार नाही.  मी सकाळी आपणास भेटून मुंबईस जाईल.''  साहेब.

दुसर्‍या दिवशी साहेबांनी नेहरूजींची भेट घेतली.

नेहरूजी वैतागलेल्या भाषेत साहेबांना म्हणाले, ''अहो चव्हाण, तुम्ही अजून इथेच आहात.  मुंबईला गेला नाहीत.  लवकर मुंबईला जाऊन तुमच्या सहकार्‍यांशी विचारविनिमय करून तुमचा वारस ठरवा आणि लवकर दिल्लीत परत पोहोचा.'' नेहरूजी.

साहेब नेहरूजींचा निरोप घेऊन मुंबईला निघाले.  महाराष्ट्र राज्याची सूत्रे कुणाकडे सोपवावी याचा विचार साहेब करू लागले.  संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी विदर्भ, मराठवाडा यांना दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत असं साहेबांनी मनोमन ठरवलं.  संरक्षण निधीला मदत करणार्‍यांच्या रांगा मुख्यमंत्र्यांच्या कक्षासमोर लागलेल्या.  उद्योगपती, सिनेसृष्टीतील दिग्गज, मराठी सिनेसृष्टीही त्यात मागे नाही.  सी. रामचंद्र, ग. दि. माडगूळकर, मराठी मनाला भुरळ घालणार्‍या सुलोचनाबाई यांनी आपल्या दिवंगत वहिनीचे दागिने संरक्षण निधीला साहेबांकडे सुपूर्द केले.  अख्खा महाराष्ट्र भारावून भारताच्या संरक्षणाकरिता सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार झाला.