• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - १५७

समुद्रावरून वाहणारा गार वारा राजभवनावरील कार्यक्रमास उल्हासित करीत आहे.  त्यातच सनईवादक बिस्मिल्लाखाँ यांच्या सनईचे सूर कानाशी लगट करू लागले.  नेहरूजींचं मन वेधून घेणारा मंजूळ स्वर शामियान्यात घुमला तो भूपाळी गात असलेल्या महाराष्ट्रकन्या लता मंगेशकर यांचा.  ज्ञानोबा माउलीचं पसायदान गाऊन या महाराष्ट्रकन्येनं महाराष्ट्राचं मन उलगडून दाखविलं.  महाराष्ट्रगीतानं हजर असलेल्यांच्या अंगावर शहारे उभे केले.  वीररसातील या गीतानं महाराष्ट्राच्या शौर्याची, सळसळत्या रक्ताच्या शूरवीरांच्या पराक्रमाची गाथा गायिली.  अशा या मंतरलेल्या वातावरणात नेहरूजींनी बारा वाजून एक मिनिटाने आपल्या शुभहस्ते केसरी रंगाचा मखमली कपडा दूर सारताच रोषणाईच्या रेशांनी नवमहाराष्ट्राच्या सीमा अधोरेखित केलेला नकाशाच्या रूपानं नवमहाराष्ट्राचा जन्म झाला.  विद्युत रोषणाईचा प्रकाश नभातील चांदण्यांच्या प्रकाशात विलीन झाला.  समुद्राच्या लाटा राजभवनाच्या किनार्‍याला स्पर्शून नवमहाराष्ट्राला मुजरा करू लागल्या.

कार्यक्रमाचे यजमान म्हणून साहेब आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे सांभाळताहेत.  श्रीमती इंदिरा गांधींचं मी महाराष्ट्रीय पद्धतीनं साडीचोळी देऊन स्वागत केलं.  साहेबांनी नेहरूजी व जयप्रकाश यांचं स्वागत केलं.  जयप्रकाश यांनी राष्ट्रपतींचा शुभेच्छांचा आलेला संदेश वाचून दाखविला.

श्रीमती इंदिरा गांधी नवमहाराष्ट्राला शुभेच्छा देताना म्हणाल्या, ''भविष्यात महराष्ट्र राज्य हे देशात स्वकर्तृत्वानं महान ठरेल.''

नेहरूजींनी आपल्या उद्‍घाटनपर भाषणात महाराष्ट्राकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या.

नेहरू म्हणाले, ''महाराष्ट्र ही पराक्रमी शूरवीरांची भूमी आहे.  या भूमीच्या त्यागाची नोंद इतिहासानं घेतलेली आहे.  स्वातंत्र्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीतून भारताला मिळाली आहे.  स्वतंत्र भारत या भूमीकडून काही अपेक्षा ठेवून आहे.  देशाच्या हिताकरिता महाराष्ट्र झटताना मला पाहावयाचा आहे.  आपल्या विकासासोबत देशाच्या विकासाला महाराष्ट्राने हातभार लावला पाहिजे.  संरक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशाच्या संरक्षणाकरिता आघाडींवर राहील असा मला आत्मविश्वास आहे.  महाराष्ट्राची जनता आधुनिक भारताच्या जडणघडणीत आपला मोलाचा वाटा उचलेल.  या महाराष्ट्राला माझा सदैव आशीर्वाद राहील.''

भावनोत्कटतेच्या परिसीमा गाठलेल्या या कार्यक्रमात भावनावश होऊन साहेब म्हणाले, ''महाराष्ट्रभगिनी लताजी यांनी ज्ञानदेवांनी नियतीकडे केलेली विनवणी या ठिकाणी व्यक्त केली - 'दुरिताचे तिमिर जावो', तीनशे वर्षांपूर्वी दीनदुबळ्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणारे महान युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म या महाराष्ट्रभूमीवर झाला.  तीन दिवसांपूर्वी २७ एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस आम्ही शिवनेरीवर साजरा केला.  स्वराज्य जन्माला घालणार्‍या या महान श्रीमानयोगीचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्याचा जन्मदिवस म्हणून राहावा अशी आमची इच्छा होती; पण लोकशाहीचा आदर बाळगून आपण तो १ मे हा नवमहाराष्ट्राचा जन्मदिवस निश्चित केला.  महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संत तुकाराम महाराजांनी आम्हाला समानतेचा मंत्र दिला.