• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

थोरले साहेब - ११७

त्रिराज्य योजना मान्य करून मुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्‍न यापूर्वी हिरेंनी केला होता.  एकमतानं निवड होत असेल तर नेतृत्वाची जबाबदारी मोरारजी स्वीकारतील असं त्यांच्या बाजूनं असणार्‍यांकडून ऐकायला मिळू लागलं.  मोरारजींऐवजी स. का. पाटलांच्या नावाचा खडा श्रेष्ठींनी टाकून बघितला.  स. का. पाटील हे कोकणातले सारस्वत.  निवडून येण्याची सूतराम शक्यता नाही.  महाराष्ट्रातील बहुजन समाजातील मंडळी त्यांचं नेतृत्व मान्य करावयास तयार नव्हती.  मोरारजी दुरावलेले आणि मुंबईत बंडाळी होऊन फाटाफूट झालेली.  अशा अवस्थेत स. का. पाटलांचा निभाव लागणे शक्य नव्हते हे श्रेष्ठींच्या लक्षात आलं.  हिरेंच्या नेतृत्वाची सूत्रं देवांनी आपल्या हाती घेतली.  साहेबांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी अनेक क्लृप्त्या देवांनी लढविल्या.  मोरारजींना भेटून आपण मुख्यमंत्री व्हावं अशी विनवणी केली.  बिनविरोध निवड होत असेल तर आपण नेतृत्व स्वीकारू, असं मत मोरारजींनी व्यज्ञात केलं.  इथेही देवांची फसगत झाली.  साहेब आणि हिरे यांच्यात नेतृत्वासाठी लढत झाली तर मोरारजींनी आपल्या बाजूचे आमदार तटस्थ ठेवावे हाही पर्याय देवांनी मोरारजींसमोर ठेवला.  या पर्यायालाही मोरारजी तयार झाले नाहीत.  शेवटी साहेब नको म्हणून हिरेंचा बळी देण्यासही देव तयार झाले.  मोरारजींनी वैकुंठलाल मेहता किंवा सी. डी. देशमुख या दोघांपैकी एकाला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा द्यावा अशी चाल खेळली.  वैकुंठलाल मेहता स्वतःच या वादात पडावयास तयार नव्हते.  सी. डी. देशमुखांना कोण मतदान करेल, असा प्रश्न समोर होता.  या पर्यायातही काही तथ्य नाही असं मोरारजींनी देवांना कळविलं.  देव चोहीकडून तोंडघशी पडू लागले.  देव भ्रमिष्ठ होऊन हिरेंच्या पाठीशी उभे राहिले.  नेतानिवडीची तारीख जवळ येऊ लागली.  प्रदेश काँग्रेस समितीची बैठक बोलावून त्यात हिरे आणि साहेब यांच्या संमतीनं एक निवड समिती निवडण्यात आली.  या समितीत गणपतराव तपासे, हरिभाऊ पाटसकर, बापूसाहेब गुप्ते व देवकीनंदन नारायण यांची निवड करण्यात आली.  या निवड समितीचा तसा काही उपयोग होईल, असं सभासदांना वाटत नव्हतं.  रामानंद तीर्थ आणि धर्माधिकारी यांनी मोरारजींची भेट घेतली.  तटस्थ राहण्याचा मनोदय मोरारजींकडं व्यक्त केला.  मोरारजींनी आपली नेतृत्व स्वीकारण्याची इच्छा या दोघांकडं व्यक्त केली; पण एका अटीवर बिनविरोध होत असेल तर.  नेतृत्व स्वीकारल्यानंतर माझं नेतृत्व न मानणार्‍यांना मला मंत्रिमंडळात स्थान देता येणार नाही हेही स्पष्ट केलं.  श्रेष्ठींनी मला माझा वारस निवडण्याचे अधिकर दिले तर संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी धुडगूस घातला त्यांची निवड करणं मला शक्य होणार नाही ही कल्पना मोरारजींनी या दोघांना दिली.  स्वामींनी आपला मोर्चा दिल्लीला वळविला.  दिल्लीनं प्रांताच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचं नाकारून आपले हात झटकले.  स्वामी, देव, धर्माधिकारी, गाडगीळ हताश होऊन हिरेंच्या पाठीशी उभे राहिले.  

साहेब, देवगिरीकर, बाळासाहेब देसाई आणि देवकीनंदन नारायण यांनी मराठवाड्यातून बाबासाहेब सवणेकर आणि भगवंतराव गाढे या स्वामी विरोधकांना जवळ केलं.  विदर्भातून गोपाळराव खेडकर, कन्नमवार यांना हाताशी धरलं.  ब्रिजलाल बियाणी आणि देविसिंग चौहान यांनी साहेबांशी जवळीक निर्माण केली.  श्रेष्ठींनी मोरारजींच्या नावाला संमती दर्शविली.  साहेबांनी मोरारजींच्या पाठीशी उभं राहायचं ठरविलं.  १६ ऑक्टोबरला असेंब्ली काँग्रेस पक्षाची बैठक झाली.  या बैठकीत साहेबांनी नेतेपदासाठी मोरारजी देसाईंचं नाव सुचविलं व आपण नेतेपदाच्या शर्यतीतून माघार घेत आहोत असं सांगितलं.  कारण काँग्रेस श्रेष्ठींनी मोरारजींच्या नावाला मान्यता दिली आहे, असं मत व्यक्त केलं.  हिरेंनी नाव मागे घेण्यास नकार दिला.  हिरे माझ्याविरोधात निवडणूक लढवीत नसतील तर अजूनही मी माझं नाव मागे घेईल, असं साहेबांनी जाहीर केलं.  हिरेंनी निवडणूक घेण्याचा आग्रह धरला.  निवडणूक बिनविरोध होत नाही हे निश्चित झाल्यानंतर मोरारजींनी नेतृत्वाच्या शर्यतीतून माघार घेतली.  रीतसर निवडणूक घेण्याचं जाहीर झालं.  बाळासाहेब देसाईंनी साहेबांचं नाव नेतेपदासाठी सुचविलं.  हिरे आणि साहेब यांच्यात नेतृत्वासाठी निवडणूक झाली.  या निवडणुकीत मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्रात मतांची फाटाफूट झाली.  हिरेंनी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून आघाडी मिळविली.  साहेबांनी ही तूट विदर्भातून भरून काढली.  मुंबई, कच्छ, गुजरात, सौराष्ट्र साहेबांच्या पाठीमागे उभे राहिले.  मोरारजींनी आपली सर्व शक्ती साहेबांच्या पाठीमागे उभी केली.  साहेबांना ३३३ मते पडली तर हिरेंना १११ मते मिळाली.  साहेब २२२ मतांनी द्वैभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले.