• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

मराठी मातीचे वैभव- ६२

समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकविध प्रश्नांचा त्यात विचार असला पाहिजे.  ज्यांना माध्यमिक शिक्षणानंतर उच्च शिक्षण देण्याची संधी मिळत नाही त्यांना माध्यमिक शिक्षणाला आपलया आयुष्याची शिदोरी मानावी लागते, आणि ती त्यांना आयुष्यभर कशी पुरेल याचा विचार माध्यमिक शिक्षण राबविणा-या मंडळींनी करणे आवश्यक आहे, असा यशवंतरावांचा आग्रह होता.  या संदर्भात ते म्हणतात, ''थोडक्यात म्हणजे काही काळ तरी माध्यमिक शिक्षण हेच बहुसंख्य मुलांच्या जीवनातील अंतिम शिक्षण असून त्यांच्यापुरते बोलायचे झाल्यास हे शिक्षण म्हणजे त्यांच्या भावी जीवनाची खूपच मोठी शिदोरी ठरणार आहे.  तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो की, हे शिक्षण पुरे होत असताना जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री विद्यार्थ्यांच्या पदरात पडते आहे किंवा नाही ?  हे सर्व पाहण्याची जबाबदारी अर्थातच शासनावर आहे आणि पर्यायाने ती आता या माध्यमिक शिक्षणमंडळावर पडणार आहे.''१९  माध्यमिक शिक्षणमंडळाच्या उद्धाटन प्रसंगी, पुणे येथे व्यक्त केलेला हा विचार आहे (७.३.१९६६).

महाराष्ट्राच्या माध्यमिक शिक्षणमंडळाकडे, शिक्षणक्षेत्रात काम करणा-या तज्ज्ञ अशा अधिकारी सेवकांचे एक पार्लमेंट, एक संसद म्हणून मी पाहू इच्छितो, असे उद्गार त्यांनी त्या प्रसंगी काढले होते.  ''कारण संसदेप्रमाणेच या मंडळावर काम करणा-या तज्ज्ञांमध्ये आपल्या विचारांची, आपल्या अनुभवांची देवाणघेवाण होईल, प्रसंगी तत्त्वांचे वा विचारांचे संघर्षही निर्माण होतील, परंतु या विचारांच्या मंथनातून आणि संघर्षातून शिक्षणक्षेत्रात काम करणा-या मंडळींना मार्गदर्शक अशी तत्त्वे तयार होतील, निर्णय घेतले जातील, आणि शिक्षणाचे हे काम उत्तम प्रकारे वाढत राहील या अपेक्षेने मी आपल्या या मंडळाकडे पाहात आहे.''२०  असे उद्गार त्यांनी काढले होते.  माध्यमिक शिक्षणाचे स्वरूप ठरविणारे हे मंडळ स्वायत्त स्वरूपाचे असावे, हाच अर्थ या शब्दांतून ध्वनित होतो.  माध्यमिक शिक्षणाचे स्वरूप ठरविण्याचे कार्य ज्यांच्यावर सोपविण्यात आले आहे त्यांना एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते यात शंका नाही.  आणि ती जबाबदारी शिक्षणक्षेत्रातील मंडळींनी पेलली पाहिजे.  ''महाराष्ट्राच्या भावी पिढीच्या संपूर्ण सांस्कृतिक जीवनाची जबाबदारी या मंडळावर आहे,''२१ असे ते म्हणाले होते.
----------------------------------------------------
१९.  कित्ता, पृ. १६६.
२०.  कित्ता, पृ. १६३-६४.
२१.  कित्ता, पृ. १६८.
----------------------------------------------------