• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ९०

लॅटिन अमेरिकन भूमीवर प्रथम पाय ठेवला. एक कोटी दहा लाख वस्तीचे हे विस्तीर्ण शहर. सात हजार फूट उंच पठारावर वसले आहे. चार साडेचारशे वर्षांचा इतिहास या शहरामागे आहे. एक सुंदर शहर म्हणून १७ व्या शतकातही या शहराला मान्यता होती.

हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत अंधार पडला होता. येथील आमचे राजदूत म्हणजे श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांचे ज्येष्ठ जामात श्री. अशोक मेहता. ते व श्रीमती चंद्रलेखा मेहता दोघेही विमानतळावर आले होते. फार आपुलकी दाखविली.

माझ्या चोवीस तासांच्या मुक्कामात एकदाही त्यांनी पंतप्रधानांशी असलेल्या नात्याचा अप्रत्यक्षही उल्लेख केला नाही; किंवा त्यांचा उल्लेखही झाला नाही. खूप गप्पा-चर्चा झाल्या.

दुसऱ्या दिवशी श्री. अशोकसह आम्ही सर्वजण नॅशनल म्यूझियममध्ये गेलो. तास दीड तास तेथे काढला. पंधराव्या शतकात युरोपमधून येणाऱ्या गोऱ्यांची वसाहत सुरू होण्यापूर्वी येथील Incas ची प्रगत संस्कृति होती.

संघटित राज्ये होती. त्या संस्कृतीचे काही अवशेष वा तिचे काहीसे चित्रण या म्यूझियममध्ये पहावयास मिळते. लॅटिन अमेरिका हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. यू. एस्. ए. आणि या अमेरिकेमध्ये काही मूलभूत फरक आहेत आणि मूलभूत संघर्षही आहेत.

दुपारचे जेवण श्री. मेहता यांच्या घरी झाले. श्रीमती चंद्रलेखांनी उत्तम व्यवस्था ठेवली होती. जेवणानंतरची विश्रांती त्यांच्या घरीच घेतली व हॅवानाला जाण्याच्या तयारीला लागलो.

मेक्सिको ते हॅवाना प्रवास योगायोगाने मेक्सिकन सरकारच्या छोटेखानी जेट-प्लेन मधून करता आला. सात माणसांचे हे विमान ४० हजार फूट उंचीवरून ताशी ५०० मैल वेगाने दोन तासात हॅवानाला पोहोचले. विमानतळावर क्यूबाचे परराष्टमंत्रि राहुल राऊ हजर होते. वेळीअवेळी येणाऱ्या पाहुण्यांचे आगत-स्वागत करण्याने थकला-भागलेला पण हसतमुख दिसला.