• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ९१

४८ क्यूबा
२० मार्च, १९७५

१६ वर्षे झाली. क्यूबामध्ये झालेल्या क्रांतीच्या रोमहर्षक कथा ऐकल्या होत्या. फिडेल कॅस्ट्रो यांचे यावर भरपूर लिखाण प्रसिध्द झाले आहे. त्यातले थोडेबहुत वाचले होते.

१९६२ चा क्यूबा-क्रायसिस जगप्रसिध्द आहे. क्रुश्चेव्ह आणि केनेडी अणुयुध्दाच्या उंबरठयावर आले होते. बुबळाला बुबळे भिडून गेली होती. आणि त्याच संदर्भात भारत-चीन युध्द मनात जागृत होते.

क्यूबामध्ये आज स्थिति काय आहे, कॅस्ट्रोची त्याच्या देशात काय प्रतिमा आहे, समाजक्रांतीचे रूप काय आहे, हे सर्व पहावयास मिळणार ही आशा ठेवूनच मी या परिषदेकडे काहीसा आकर्षित होतो.

दि. १७ ला सकाळी कॅस्ट्रो जेवणाच्या ठिकाणी भेटले. सर्वांशी मिळून-मिसळून वागत होते. संभाषणात मृदुता होती. डोळे स्वच्छ आणि मोकळे मोकळे वाटले.

दुसरी भेट दि. २० ला दुपारनंतर ५ वाजता त्यांच्या कचेरीत झाली. श्री. केवलसिंग (Foreign Secretary ) बरोबर होते. अॅम्बॅसडर श्री. टंडनही होते.

४०-४५ मिनिटांच्या या भेटीत त्यानींच हिंदुस्थानसंबंधी अनेक प्रश्न विचारले. मी माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांच्या बोलण्यात वागण्यात सिन्सिरिटी ओथंबत आलेली होती.

न्युक्लिअर एक्स्प्लोजनचा प्रश्न निघाला. ''तुमच्याकडे ही प्रगति आहे. आमच्याकडे नाही. साम्राज्यशाहीच्या सागरामध्ये आम्ही एक लहानसे बेट आहोत.'' असे ते म्हणाले. मी म्हणालो, ''पण गेल्या १६ वर्षांत तुम्ही हे सिध्द केले ना की ध्येयनिष्ठ जनतेचा एकमुखी निर्धार म्हणजे एक अणुबॉम्बच आहे. खऱ्याखुऱ्या अणुबॉम्बचा सागर तुमची शक्ति रोखू शकणार नाही.''
कॅस्ट्रो मनमोकळेपणाने खळखळून हसले.

कॅस्ट्रोची राजवट रूजली आहे. अंतर्गत विरोध छुपा असला तर न जाणे ! पण सर्वांच्या बोलण्यात तसा काही विरोध नाही असेच आले.

कोलंबस या बेटावर उतरला तेव्हापासून या बेटाचा इतिहास इतर वसाहतींचा इतिहास असतो तसाच आहे.

आफ्रिका, युरोपमधून लोक आले. जुन्यांना नामशेष केले. नवे एकमेकांत मिसळून एक मिश्र समाज बनला. परंतु आर्थिक अधिराज्य अमेरिकेचे आले. त्यात या बेटातील सामान्यांचे जीवन अपमानितांचे जीवन होते.

क्रांतीला लागणारे सर्व सामान तयार होते. अरेराव, बेफिकिर राज्यकर्ते, विलक्षण भ्रष्टाचार, नव्या पिढीकडे संपूर्ण दुर्लक्ष याच्या माध्यमानेच क्रांति येते. त्याला नेतृत्व देण्याचे धैर्य व निष्ठा कॅस्ट्रोंनी दाखविली.