• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

विदेश दर्शन - ८९

४७ हॅवाना
२० मार्च, १९७५

दिल्ली सोडून एक आठवडा झाला. परंतु निवांत बसून काही लिहीन म्हटले तरी शक्यच झाले नाही.

दिल्लीहून निघाल्यानंतर १३-१४ तासांच्या प्रवासानंतर पॅरिसमध्ये पोहोचलो. वाटेत रोममध्ये श्री. अप्पासाहेब पंत भेटले. येत्या नोव्हेंबरमध्ये परत येणार आहेत.

पॅरिसमध्ये धुके आणि पावसाळी हवा होती. पॅरिस हिल्टनमध्ये तो दिवस काढला. श्री. चटर्जी - येथील राजदूत - यांच्याबरोबर शहरात एक फेरफटका मारला. पावसाची झिरझिर चालू होती धुके होते. त्यामुळे गाडीतून उतरून चालण्याची संधी मिळाली नाही. रात्री त्यांच्या घरी जेवण झाले.
 
त्यांनी येथील पार्लमेंटचे एक महत्त्वाचे व त्यांचे मित्र-सभासद सपत्निक आमंत्रित केले होते. दोघेही नवरा-बायको हिंदुस्थानचे मित्र दिसले.

मोठी तेज बाई होती. एकदम स्पष्ट 'अॅटमबॉम्ब जरूर बनवा.' तुमची इज्जत वाढेल - तिने सल्ला दिला. आमचे ते धोरण नाही असे मी समजावले. पण थोडेच ते मानणार! तिचे प्रवचन चालू होते. नवरा गंभीर वाटला. न्यूक्लिअर सायन्सच्या क्षेत्रात इंडो-फ्रेंच सहकार्य वाढले पाहिजे असे त्याचे मत आहे. परंतु Subtle pressure from western powers and Russians on our leaders is building up. One has to take care of it. त्याने आतली माहिती सांगितली आणि सल्लाही दिला.

सकाळी १० वाजताच हॉटेल सोडले. पॅरिसचे बरेच दूर, पण नवे, विमानतळ गाठावयाचे होते. वाटेत एका गाडीला अक्सिडंट झाला होता. त्यामुळे ट्रॅफिकची रांगच्या रांग मैल दोन मैल थांबलेली. आमचा ड्रायव्हर मोठा चलाख. त्याने कसातरी मार्ग काढून, आम्ही चांगलेच वेळेत पोहोचलो. परंतु आमचे सामान, पासपोर्ट वगैरे कागदपत्र व विमानाची तिकिटे पाठीमागच्या गाडीत असलेल्या ऑफिसरजवळ होती.

विमान सुटावयाला पाच मिनिटे राहिली तरी त्यांचा पत्ता नव्हता. माझी हँडबॅग माझ्याजवळ होती. विमानातील सीट नंबरचे कार्ड होते. मी सामानाशिवाय व पास-पोर्टशिवायही जायचे ठरविले होते. कारण नाहीतर हॅवानामध्ये वेळेवर पोहोचणे शक्यच नव्हते.

राजदूत बिचारा गोंधळून गेला. पण अगदी शेवटच्या घटकेला आमचे लोक पोहोचले. कसेतरी करून विमानाला थोडा उशीर करून, आम्ही स्थानापन्न झालो.

दुसरा १३ तासांचा विमानप्रवास सुरू झाला. हाऊस्टिन (टेक्सास) मार्गे मेक्सिकोला पोहोचलो संध्याकाळी साडेसहाला. (लोकल-टाइम).