• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (129)

मराठीचे सर्वसंग्राहक स्वरूप

साहित्य संमेलनात, कोणत्याही मराठी भाषक माणसाला भाग घेण्याची संधी मिळणे ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. मराठी साहित्याची मी काही महत्त्वाची सेवा केली आहे आणि म्हणून माझी या वेळी आठवण करण्यात आली आहे, असल्या कोणत्याही भ्रमात मी नाही. मी केवळ एवढेच म्हणू शकतो, की माझ्याबद्दल आपणास वाटणारा जिव्हाळा आणि मराठी भाषा तसेच मराठी भाषकांबद्दल माझ्या मनात असलेली नितांत श्रद्धा यांमुळेच आजच्या ह्या प्रसंगी मला आमंत्रित करण्यात आले आहे; आणि केवळ या एकाच भावनेने मी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे.

साहित्य संमेलन भरवून, आपण एक प्रकारे विस्मृत इतिहासाला उजाळाच दिला आहे.
व-हाड-मराठवाड्याची ही भूमी मराठी भाषेची जननी आहे, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. शेकडो वर्षे येथील जनजीवनात घडलेल्या घटनांचा व संघर्षाचा परिणाम म्हणून, मराठी भाषेला येथेच अंकुर फुटले, या भूमीतच तिचे पालनपोषण झाले आणि एक स्वतंत्र भाषा म्हणून मराठी भाषेने नेत्रदीपक विकास केला, याचे कारणही स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर इतिहासाची जास्त कडक नजर राहिली आहे. आर्य आणि अनेक आर्येतर जातींची पदचिन्हे आजही येथील भूमीवर पडलेली आढळतात. नग, अभीर, सातवाहन, यादव, मुसलमान, मराठे या सर्वांच्या राजवटीत जेवढी परिवर्तने झाली, त्या सर्वांचा परिणाम येथील बोल-भाषांवर झाला. मराठी भाषेच्या स्वरूपासंबंधी विचार केल्यास असे म्हणता येईल, की गेल्या दोन हजार वर्षांतील सर्व घटनांचा परिणाम या भाषेच्या विकासावर झाला आणि त्यातूनच मराठीचे आधुनिक रूप साकार झाले. तेव्हा या प्रदेशात राहणा-या लोकांच्या स्वभावातील सर्व गुणविशेष मराठीत दिसले, तर त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. साहित्यात प्रादेशिकता काही अंशी असते, असे वाटते. जमिनीचा कस वेगळा असला, की पिकाचे प्रमाण व प्रकार बदलतात, तसे काही अंशी साहित्यनिर्मितीचे असते. म्हणून विदर्भाच्या साहित्यात येथील मूल्यांचा, येथील परंपरेच्या संस्कारांचा अंश असणे अपरिहार्य आहे. साहित्याची समृद्धी यामुळेच वाढते. महाराष्ट्र या दृष्टीने भाग्यशाली आहे. त्यातील विविध विभागांच्या वैशिष्ट्यपूर्ण साहित्यामुळे त्याची भाषा संपन्न झाली आहे. विदर्भ साहित्य संमेलनाकडे मी याच दृष्टीने आकर्षित झालो. तेथील साहित्याचे नवे उन्मेष समजावेत, ही माझी इच्छा आहे.