• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (137)

या सर्वांना एका धाग्याने बांधणारी एक नवी जाणीव विज्ञानयुगाने निर्माण केली आहे. आजकाल त्याचा प्रत्यय अनेक स्वरूपात येतो. हजारो मैल दूर चाललेल्या घटना तुमच्या-माझ्या दैनिक जीवनावर मूलग्राही स्वरूपाचे परिणाम करू शकतात, याची जाणीव आता वाढू लागली आहे. या अनुभूतीचे कलापूर्ण चित्रण श्री. सत्यजित रे यांच्या 'अशनि संकेत' (डिस्टंट थंडर) चित्रपटात परिणामकारक रीतीने चित्रित केले आहे. दुस-या महायुद्धाच्या काळी युरोपमध्ये व दूर पॅसिफिकमध्ये चाललेल्या युद्धाच्या कथा ऐकताना रम्य वाटल्या; परंतु हळूहळू त्याचा परिणाम ब्रह्मदेशपर्यंत पोहोचल्यानंतर, सकाळ-संध्याकाळ जेवताना मिळणारा तांदूळ कमी पडू लागल्यानंतर, लक्षावधींना मृत्यूच्या, भयानक दुष्काळाच्या खाईत जाण्याचा प्रसंग जेव्हा बंगालमध्ये १९४३ साली आला, त्यातून मानवतेची नियती एकाच धाग्यात गोवलेली आहे, याची जाणीव झाली. या जाणिवेचा एक स्पष्ट अर्थ असा, की सामाजिक, राजकीय व साहित्यिक मूल्यांची एकमेकांपासून फारकत करता येत नाही. आजही भारतांतर्गत समस्यांचा विचार करीत असताना हा संदर्भ तुम्हा-आम्हाला विसरता येणार नाही. राष्ट्रीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यक्तींना स्वातंत्र्यावर आधारलेले अनेक अधिकार जसे प्राप्त झाले आहेत, तशाच काही जबाबदा-याही आहेत. हे स्वातंत्र्य आणि जबाबदा-या यांना एकमेकांपासून अलग करून चालणार नाही. या दोहोंचा पीळदार गोफ गुंफण्याचा निर्धारपूर्वक प्रयत्न आपल्या देशात झालेला नाही. हे घडले नाही, तर राष्ट्रीय स्वातंत्र्य कदाचित धोक्यात येण्याचा संभव आहे. हा एक विचार आपल्या चिंतनासाठी यानिमित्ताने आपल्यापुढे मांडू इच्छितो. मुक्त विचाराचा सिद्धान्त हा एक आकर्षक विचार आहे आणि मूलत: समर्थनीय आहे. पण आजच्या सामाजिक, आर्थिक क्षेत्रांत उभे असलेले इतर राष्ट्रीय प्रश्न यांचा संदर्भ विसरून हा सिद्धान्त यशस्वी होऊ शकेल काय, याचेही चिंतन होण्याची गरज आहे.

नव्या समाजरचनेच्या दृष्टीने मूलभूत महत्त्वाचे आणि ललित साहित्याशी अत्यंत निगडित असलेले आणखी दोन विषय आहेत. ते म्हणजे दलित वर्ग व स्त्री. दोन्ही प्रश्नांना नव्या सामाजिक प्रबोधानात फार महत्त्वाचे स्थान आहे. राजकीयदृष्ट्या त्यांना जे स्थान मिळावयाचे, ते आपण दिले, असे कदाचित म्हणता येईल. आपल्याकडे राजकीय हक्क आधी मिळाले आहेत. पण अजून त्या हक्कांना सामाजिक बळ (सँक्शन) मिळवून देण्यात महत्त्वाचे काम झालेले नाही. पाश्चात्त्य देशांत ही प्रक्रिया वेगळी होती. येथे मात्र आपल्या राजकीय स्वातंत्र्यलढ्यात आपण स्वीकारलेल्या उदारमतवादाची परिणती आपल्या राज्यघटनेत झाली. पण आपले सामाजिक मन मात्र संकुचित राहिले आहे. हा विसंवाद जितक्या लवकर नाहीसा होईल, तितके समाजातील तणाव कमी होतील. आज जे तणाव आहेत, त्यांचे स्वरूप समाजापुढे आणले पाहिजे आणि या विसंवादाचा वेध घेऊन ते मोडून काढले पाहिजेत.