• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

ऋणानुबंध (116)

मी कोणाला कमी लेखण्यासाठी याचा उल्लेख करीत नाही; परंतु ऑक्सफर्डसारख्या ठिकाणी ते जे गेले, ते केवळ धर्माचा तौलनिक अभ्यास करावा आणि त्याआधारे स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडवावे, या भावनेने ते गेले. त्यासाठी आलेल्या अडचणी दूर करण्याकरिता त्यांना बरेचसे प्रयत्न करावे लागले. तेथे ते दोन वर्षे राहून परत आले आणि व्यासंगाच्या त्या क्षेत्रातच ध्येयवादी जीवन त्यागाने जगले. मघा ज्या विषयाचा मी काहीसा उल्लेख केला, त्याचीच थोडी पुनरावृत्ती करावी लागणार आहे. परंतु तेव्हाच्या हिंदुस्थानच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे वेगळे विचारप्रवाह होते, त्या विचारप्रवाहांशी सहानुभूतीचे, जिव्हाळ्याचे संबंध असताना त्या कोणत्याही एका प्रवाहाशी ते एकरूप होऊ शकले नाहीत. ते प्रार्थनासमाजवादी होते. भांडारकरांच्यामार्फत त्यांनी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली म्हटले तरी चालेल. राममोहन रॉयना ते हिमालय मानत होते. पण तेव्हाचे प्रार्थनासमाजी हे सगळे नेमस्त राजकारणी होते. ते प्रार्थनासमाजी होते, पण नेमस्त राजकारणाशी एकरूप झालेले कधी आढळत नाहीत.

राष्ट्रनेते लोकमान्य टिळक राजद्रोहाच्या आरोपावरून तुरुंगात गेले, त्या वेळी अण्णासाहेब प्रार्थनासमाजाच्या व्यासपीठावर प्रार्थना करावयाला उभे राहिले आणि त्यांनी प्रार्थना केली, की
'हिंदुस्थानच्या या थोर राष्ट्रपुरुषाला, हे ईश्वरा, विश्रांती दे आणि आरोग्य दे.'

आता प्रार्थनासमाजाचे व्यासपीठ जहाल राजकारणापासून चार हात दूर राहणारे व्यासपीठ. राजद्रोहाची शिक्षा ओढवून घेणा-या टिळकांकरिता ही प्रार्थना आणि प्रार्थनासमाजाच्या व्यासपीठावर ! वरवर ही गोष्ट अवघड दिसते; परंतु महर्षी शिंद्यांच्या बाबतीत ती अगदी सहज, सुसंगत अशीच गोष्ट होती. ते संशोधक विद्वान होते. त्यांचे सगळे लेखन जर आपण पाहिले, तर आश्चर्य वाटेल, इतक्या मूलग्राही पद्धतीने विचार करून ते लिहिले आहे.

त्यांनी लिहिलेला शब्द हा काही शेवटला शब्द आहे, असे म्हणता येणार नाही. त्यांनी सांगितले, तेच खरे आहे, असे म्हणणा-यांपैकीही मी नव्हे. सामाजिक शास्त्रांमध्ये व इतर क्षेत्रांतील शास्त्रीय ज्ञानामध्ये इतके बदल दररोज घडत आहेत, की दहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला ज्ञानकोश (एन्सायक्लोपीडिया) त्याची जर पुनरावृत्ती प्रसिद्ध करावयाची असेल, तर संपादकांना पुन्हा विचार करावा लागतो. त्या क्षेत्रामधील तज्ज्ञांमध्ये हा एक चर्चेचा विषय होता, की ज्ञानकोश पुनर्मुद्रित करावयाचा, की नवीन करावयाचा? आणि शेवटी निकाल असा झाला, की ज्ञानकोश पुनर्मुद्रित करता येत नाही आणि म्हणून तो नवीन लिहावा. ज्ञान असे वाढते आहे. म्हणून त्यांनी सांगितलेले आज शेवटचा शब्द म्हणून आपण काही मानणार नाही.परंतु असे पाहा, की त्या वेळी जे प्रश्न समोर आले, त्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अस्पृश्यतेचा प्रश्न त्यांच्यापुढे आला. एका मानवतावादी विचारदृष्टीने व समाजशास्त्री या नात्याने त्यांनी हा प्रश्न तपासला व आपली जीवनमूल्ये निश्चित केली. ते धर्मोपदेशक होते.