१९६३ - अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे सचिव मॅक्नोरा यांच्या निमंत्रणावरुन अमेरिकेस भेट.
१९६३ - ऑगस्ट, रशियाचा दौरा - रशियन पंतप्रधान क्रुश्चेव्ह यांच्याशी चर्चा, मदतीचे आश्वासन.
१९६४ - ऑगस्ट २८, रशियाचा दौरा.
१९६४ - दिल्लीतील महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
१९६५ - जानेवारी, नांदेड येथे भरलेल्या ४७ व्या अ.भा.म.नाटय परिषद - अधिवेशनाचे उद्घाटक
१९६५ - ऑगस्ट १८, आई विठामाता यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन - मुंबई .
१९६६ - जानेवारी, ताश्कंद येथे शास्त्रीजी - आयुबखान चर्चेस उपस्थित (कोसिजिन यांच्या प्रयत्नानुसार)
१९६६ - नोव्हेंबर १४, केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती.
१९६७ - गृहमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांतच नव्याने दहा राज्यपालांची नियुक्ती.
१९६९ - नोव्हेंबर, बंगलोर काँग्रेस अधिवेशनानंतर काँग्रेस पक्ष दुभंगला गेला.
१९६९ - फेब्रुवारी २३, कानपूर विश्व विद्यालयाने 'डॉक्टर ऑफ लॉ' सन्मानपूर्वक बहाल.
१९७० - जून २६ केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नियुक्ती.
१९७० - फेब्रुवारी १०, औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी.
१९७१ - विकसनशील राष्ट्र परिषदेमध्ये आर्थिक विकासासंबंधी चर्चा.
१९७२ - सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवड, लोकसभेच्या ४३ जागा जिंकल्या ( महाराष्ट्रात).
१९७४ - डिसेंबर १, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठाची 'डॉक्टर ऑफ लॉ' ही पदवी.
१९७५ - ऑक्टोबर, केंद्रीय परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती.
१९७५ - गियाना, क्युबा, लेबेनॉन, इजिप्त, पेरु, अमेरिका, अफगाणिस्तान, इराक, कुवेत व फ्रान्स इत्यादी राष्ट्रांना भेटी.
१९७५ - डिसेंबर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, कर्हाड येथे भरलेले होते. त्याचे स्वागताध्यक्षपद.
१९७६ - जानेवारी १७, परभणी मराठवाडा कृषी विद्यापीठाची डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी.
१९७६ - तुर्कस्थान, अल्जेरिया या देशांना भेटी.
१९७६ - ऑक्टोबर ८, सदिच्छा राजदूत म्हणून अमेरिकेतील होस्टन येथील टेक्सास शहरातर्फे मानपत्र.